झारखंडमध्ये टंग्स्टनचा खजिना सापडला

झारखंडमध्ये टंग्स्टनचा खजिना सापडला

  • झारखंडमध्ये जमिनीखाली टंग्स्टन या दुर्मिळ धातूचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता टंग्स्टनच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होणार असून याबाबतीत चीनवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे.
  • झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील सतलुआ परिसरात टंग्स्टनचे साठे सापडले आहेत.
  • सध्या भारत १०० टक्के टंग्स्टनची आयात करतो. टंग्स्टनचा सर्वात मोठा निर्यातदार देश चीन आहे. चीनमध्ये टंग्स्टनचे ५६ टक्के साठे आहेत.

टंग्स्टनचा उपयोग :

  • टंग्स्टनचा सर्वाधिक वापर विजेच्या बल्बमध्ये केला जात असे. फायटरजेट रॉकेट, एअरक्रॉफ्ट, ऑटोमिक पॉवर प्लँट, ड्रिलिंग आणि कटिंग टूल्स, स्टेनलेस स्टील वेल्डिंग, दातावरील उपचार व उच्च तापमान असलेल्या ठिकाणी याचा उपयोग होतो.

भारताचे टंग्स्टनचे साठे:

  • झारखंड – गढवा जिल्हा, राजस्थान – नागौर, डेगाना, महाराष्ट्र – नागपूर, पश्चिम बंगाल – बाकुडा

टंग्स्टनविषयी : टंग्स्टनचा अणुअंक ७४ आहे तर संज्ञा W असून वुल्फ्राम या जर्मन नावावरून आहे.

Contact Us

    Enquire Now