ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन 

  • आपल्या उत्कृष्ट – कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी अभिनयास सुरुवात केली. भारदस्त शरीरयष्टी, दमदार आवाज, झुपकेदार मिश्या यांच्या जोरावर त्यांनी खलनायक, सरपंच, पुढारी इ. भूमिका साकारल्या.
  • १९४४ मध्ये बालगंधर्व व आचार्य अत्रे नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष असताना त्यांनी वयाच्या अवघ्या साडे सहाव्या वर्षीच बाल नाट्यात भूमिका केली होती.
  • मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत त्यांनी नाटकाची हौस भागवली.
  • १९७४ मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींसोबत ‘अरण्यक’ हे नाटक पहिल्यांदा केले वयाच्या ८२ व्या वर्षी त्याच नाटकात त्यांनी ‘धृतराष्ट्राची’ भूमिका उत्तम प्रकारे केली.
  • मृत्यू अटळ आहे पण मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ८३ व्या  वर्षी अखेरचा श्वास घेतला.
  • त्यांनी २०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत व १२५ हून अधिक नाटकांत अभिनय केला.

 

अन्य नाटके

 

  1. प्रपंच करावा नेटका 
  2. हृदय स्वामिनी
  3. बेकेट
  4. माऊबंदकी
  5. अरण्यक 
  6. कौमेय
  7. मुद्राराक्षस

 

चित्रपट

 

  1. अशा असाव्या सुन्या
  2. उंबरठा
  3. तेजाब (हिंदी)
  4. प्रतिघात (हिंदी)
  5. बिनकामाचा नवरा
  6. सिंहासन
  7. तक्षक (हिंदी)

 

मालिका

 

  1. आमची माती आमची माणसं
  2. गप्पागोष्टी
  3. अग्गबाई सासुबाई
  4. तेरा पन्ने

Contact Us

    Enquire Now