जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक २०२० मंजूर

जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक २०२० मंजूर 

  • २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीर भाषा विधेयक २०२० ला मंजुरी दिली. 
  • या कायद्यानुसार आधी असलेल्या उर्दू व इंग्रजी या भाषांसह ‘काश्मिरी, डोगरी व हिंदी’ या नव्याने बनलेल्या जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत भाषा असतील.
  • त्यामुळे आता जम्मू-काश्मीरच्या ५ अधिकृत भाषा राहतील.
  • हे विधेयक पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे केंद्रमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडले होते. 
  • संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल. 

इतर माहिती:

  • ४ मे २०२० रोजी पुलित्झर पुस्तक पुरस्कारासाठी तीन भारतीय छायाचित्रकारांची निवड करण्यात आली. 
  • १. दार यासीन, २. मुख्तार खान, ३. छन्नी आनंद 
  • यांना ३७० कलम हटवल्यानंतर व कोरोना लॉकडाऊन काळात जम्मू-काश्मीरची अपवादात्मक स्थिती दाखवण्याच्या धैर्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. 

जम्मू व काश्मीर : 

  • नायब राज्यपाल – मनोज सिंह 
  • राजधानी – श्रीनगर (उन्हाळा) जम्मू (हिवाळा)

Contact Us

    Enquire Now