जगातील सर्वात मोठ्या रेडिओ वेधशाळेची उभारणी

जगातील सर्वात मोठ्या रेडिओ वेधशाळेची उभारणी

  • ‘स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी’ या जगातील सर्वात मोठ्या रेडिओ वेधशाळेची उभारणी करण्यात भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
  • या प्रकल्पांतर्गत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ दुर्बिणी उभारल्या जातील. या दुर्बिणीद्वारे लाखो प्रकाशवर्ष दुरच्या रेडिओ लहरींच्या नोंदी घेतल्या जातील. या नोंदीचे विश्लेषण करून दीर्घिका, ताऱ्यांच्या निर्मितीपासून अन्यत्र जीवसृष्टी आहे का? अशा अनेक विषयांवर संशोधन केले जाणार आहे.
  • या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक प्रणाली विकसित करण्याची मोठी जबाबदारी भारतावर आहे. सॉफ्‍टवेअर, हार्डवेअरच्या रूपात प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांसाठी अंदाजे सहाशे कोटींचे योगदान भारताकडून दिले जाईल.
  • या प्रकल्पातील सहभागी देशांना गुंतवणुकीच्या प्रमाणात निरीक्षणासाठी वेळ उपलब्ध होईल.
  • या प्रकल्पातील रीजनल डेटा सेंटर पुण्यात उभारले जाणार आहे.
  • प्रा. फिलिप डायमंड हे या प्रकल्पाचे महासंचालक आहेत.
  • या प्रकल्प कार्यकारिणीत सदस्य देश पुढीलप्रमाणे : दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, इटली, ब्रिटन, पोर्तुगाल
  • निरीक्षक देश : भारत, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, चीन, दक्षिण कोरिया, स्वीडन, स्वित्झर्लंड.

Contact Us

    Enquire Now