जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर

जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर

  • तुर्कीतील हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रुपांतर करण्यात आले आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी घोषणा केली. 
  • ख्रिश्चन बायझन्टाईन साम्राज्यात निर्मिती झालेल्या हागिया सोफिया संग्रहालयाचा युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे.
  • ऑटोमनांच्या कॉस्टंटिनोपलच्या विजयानंतर १४५३ साली या संग्रहालयाचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आले होते.
  • एर्दोगन यांच्या या निर्णयामुळे ख्रिश्चन लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. युरोप, ग्रीस तसेच तुर्कस्तानचा मित्र रशिया या निर्णयामुळे नाराज आहेत.

जागतिक वारसा स्थळाबाबत महत्त्वाचे :

  • जुलै २०१९ पर्यंत १६७ देशातील १०९२ ठिकाणांची निवड युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केली आहे.
  • जागतिक वारसा स्थळाची निवड होण्यासाठी प्रथम युनेस्कोचे नामांकन मिळावे लागते त्यासाठी या स्थळाचे नाव युनेस्कोच्या संभाव्य यादीत असणे आवश्यक असते.
  • जागतिक वारसा स्थळांना युद्धकाळात नुकसान पोहोचू नये किंवा ती नष्ट होऊ नये यासाठी या साइटसचा युनेस्कोने जिनिव्हा कन्व्हेन्शन करारांतर्गत संरक्षित केलेल्या आहेत.
  • युनेस्कोची समिती ज्या निकषावर किंवा वैश्विक मूल्यांवर आधारित हा दर्जा देते, त्यांचे जतन न झाल्यास त्यांचा दर्जा काढून घेण्याचे अधिकार समितीला असतात.
  • सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे इटली आणि चीनमध्ये प्रत्येकी ५५ आहेत तर भारतात एकूण ३८ जागतिक वारसास्थळे आहेत.(शेवटचे जयपूर – २०१९ – ३८ वे)

सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारे देश

१) इटली, चीन – ५५

२) स्पेन – ४८

३) जर्मनी – ४६

४) फ्रान्स – ४५

५) भारत -३८ (३० सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र वारसास्थळे)

Contact Us

    Enquire Now