छत्तीसगडच्या चौथ्या व्याघ्र प्रकल्पास मंजुरी

छत्तीसगडच्या चौथ्या व्याघ्र प्रकल्पास मंजुरी

  • छत्तीसगडमधील चौथ्या व्याघ्र प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
  • छत्तीसगडमधील तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य आणि गुरू गोविंदास राष्ट्रीय उदयानाच्या संयुक्त क्षेत्राचा या व्याघ्र प्रकल्पात समावेश होणार आहे.
  • या प्रकल्पामुळे भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या एकूण ५३ इतकी झाली आहे.
  • वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ३८ V (१) नुसार राज्य शासन, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सुचनेनुसार व्याघ्र प्रकल्प व त्याचे क्षेत्रफळ जाहिर करते.

नवीन व्याघ्र प्रकल्प

  • हा नवीन व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि झारखंड या तिनही राज्यांच्या सीमेस लागून आहे.
  • छत्तीसगडमधील उदंती सोतानदी, इंद्रावती, अमरकंटक अचानकमार व्याघ्र प्रकल्पांनंतर हा चौथ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे.
  • या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश आणि झारखंडमधील वाघांना कॉरिडॉर प्राप्त होणार आहे.

राष्ट्रीय व्याघ्रगणना, २०१८

  • राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांच्यामार्फत दर चार वर्षांनी राष्ट्रीय स्तरावर व्याघ्र गणना करण्यात येते. ‘भारतातील वाघांची स्थिती – २०१८’ अहवालानुसार भारतातील वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ होऊन २९६७ इतकी झाली आहे.
  • २०१४ साली वाघांची संख्या २२२६ इतकी होती.
  • मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक ५२६ तर कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये अनुक्रमे ५२४, ४४२ वाघ आहेत.
  • महाराष्ट्राने ३१२ संख्येसह चौथे स्थान पटकावले (२०१४ साली-१९० वाघ)
  • या अहवालानुसार बक्सा (BU×a) – पश्चिम बंगाल, पलामाऊ (झारखंड) आणि डंपा (मिझोराम) येथील व्याघ्र प्रकल्पांत एकही वाघ आढळून आला नाही.
  • महाराष्ट्रात सध्या (सहा राष्ट्रीय उदयाने, ४९ अभयारण्ये, आणि सात संवर्धित राखीव क्षेत्र आहे. (आर्थिक पाहणी २०२०-२१)

जागतिक व्याघ्र दिन

  • २०१० साली रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे १३ राष्ट्रांची व्याघ्र परिषद भरविण्यात आली होती. यात २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • त्याचवर्षापासून २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जाते.
  • २०२१ ची संकल्पना = त्यांचे अस्तित्व आपल्या हातात.

Contact Us

    Enquire Now