ग्रीसमध्ये हवामान संकटाला सामोरे जाण्यासाठी मंत्रालयाची स्थापना

ग्रीसमध्ये हवामान संकटाला सामोरे जाण्यासाठी मंत्रालयाची स्थापना

  • ग्रीस सरकारने हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे.
  • एव्हिया बेट व दक्षिण ग्रीसमधील जंगलातील वणव्यामुळे १००० चौरस किमी (३८५ चौरस मैल) जंगल नष्ट झाले आहे, या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • हे मंत्रालय हवामान बदलामुळे वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी आपत्ती निवारण व अग्निशमन धोरणांचा विचार करेल.
  • युरोपियन युनियनचे माजी आयुक्त ख्रिस्तोस स्टायलिनाइड्‌स यांची येथे मंत्री म्हणून नियुक्ती केली.
  • २०१४ आणि २०१९ दरम्यान मानवतावादी मदत आणि व्यवस्थापन आयुक्त म्हणून ते कार्यरत होते.

इतर महत्त्वाच्या बाबी

  • २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये हवामान आणिबाणी जाहीर केली होती.
  • ब्रिटननंतर आयर्लंड हवामान आणिबाणी घोषित करणारा दुसरा देश ठरला.

Contact Us

    Enquire Now