ग्रामीण भागात देणार दरडोई ५५ लिटर पाणी

ग्रामीण भागात देणार दरडोई ५५ लिटर पाणी

  • सन २०१४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिवस गुणवत्तापूर्ण पाणी देण्यात येणार आहे.
  • यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेवर केंद्र आणि राज्य ५०:५० टक्के खर्च करणार आहे. या मिशनसाठी मिशन संचालक या पदासाठी आयएएस संवर्गातील सचिव दर्जाचे पद नव्याने निर्माण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP)

  • उद्देश : राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.

योजनेच्या अटी

  • १) गावाची लोकसंख्या किमान १००० असावी.
  • २) पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसाव्या.
  • या अंतर्गत दरडोई दरदिवशी पाणी पुरवठा पुढीलप्रमाणे
  • १) शहरालगतच्या ग्रामपंचायती/वाड्या व वस्त्यांसाठी दरडोई ७० लिटर प्रति दिवस
  • २) इतर ग्रामपंचायती/वाड्यावस्त्यांसाठी दरडोई ४० लिटर प्रति दिवस
  • मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनाचा कालावधी 
  • ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आला आहे. पण मंजुरी दिलेल्या प्रगतिपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याकरिता आता या योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Contact Us

    Enquire Now