गोल्डन बर्ड बिंग भारताचे सर्वात मोठे फुलपाखरू

गोल्डन बर्ड बिंग भारताचे सर्वात मोठे फुलपाखरू 

  • ‘गोल्डन बर्ड बिंग ‘ (ट्रोइड्स आयकास )नावाच्या हिमालयातील फुलपाखराने ८८ वर्षांनंतर ‘सदर्न बर्डबिन्ग्स’ (ट्रोइड्स मायनस) या फुलपाखराला मागे टाकत भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू बनले. 
  • गोल्डन बर्डबिंगच्या मादी प्रजातीचे पंख १९४ मि मि  असून ते दक्षिणी बर्डबिंगपेक्षा  ४ मि मि  ने मोठे आहे. 
  • पंख असलेल्या गोल्डन बर्डबिंगच्या पुरुष प्रजातीतील सर्वात मोठे पंख १०६ मि मि आहे. 
  • सर्वात मोठी महिला गोल्डन बर्डबिंगची फोरविंग लांबी ९० मि मि  आहे. 
  • महिला फुलपाखराची नोंद उत्तराखंडमधील ‘दीदीघाट’ येथून झाली आहे तर पुरुष फुलपाखरू मेघालयाची राजधानी शिलौंग मधील वानखर बटर फ्लाय संग्रालयामध्ये आहे. 
  • उत्तराखंडमधील इतर प्रजातींमध्ये कॉमन विंडमिल  (९८ मि  मि) ग्रेट विंडमिल (९६ मि  मि) आणि कॉमन पिकॉक (७८ मि मि) आहे.
  • सर्वात लहान म्हणजे ज्याचे पंख १८ मि मि  आहे. 
  • फुलपाखरू हे फिइलम आर्थोपोडाच्या लेपिडॉप्टेस आर्डरमधील कीटक आहेत, ज्यात पतंगदेखील समाविष्ट आहे. 

सदर्न बर्डविंग्जबद्दल

    • सदर्न बर्डविंग्ज  १९० मि मि  नोंद ब्रिटिशियर इव्हान्स या ब्रिटिश सैन्य अधिकारी आणि लेपिडोप्टेटिस्ट (फुलपाखरे आणि पतंगाचा अभ्यास किंवा संग्रहित करणारे व्यक्ती) यांनी १९३२ मध्ये केली होती. 
    • त्यांनी फुलपाखराचे वक्षस्थानाच्या मध्यभागीपासुन फॉटिंग शिखराच्या टोकापर्यंत मोजले, अचूक मोजमाप प्राप्त करण्यासाठी मोजमापाचा निकाल नंतर दुप्पट केला. 
    • वैद्यानिक नाव  – ट्रॉइडस मायनस 
    • आढळ  – दक्षिण भारत 
    • IUCN ने सदर्न बर्डविंग्ज या फुलपाखराला तांबड्या यादीतील संकटग्रस्त गटामध्ये टाकले आहे. 

 

  • IUCN :

 

  • जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जागतिक पर्यावरण संघटना
  • पूर्ण रूप  : international Union for Conservation  of Nature 
  • स्थापना : १९४८
  • मुख्यालय : ग्ल्यांड (स्वीझर्लंड)
  • रेड लिस्टचे मुख्यालय  : युनायटेड किंग्डम.
  • १९९४ पासून रेड लिस्टची सुरुवात झाली. 
  • यापूर्वी महाराष्ट्र्, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांनी आपले राज्य फुलपाखरू घोषित केले आहे. 
  • महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे देशातील पहिले राज्य आहे. (उत्तराखंड – दुसरे)

विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू :

१) महाराष्ट्र – ब्लू मोरमॉन 

२) उत्तराखंड – कॉमन पिकॉक

3) कर्नाटक  – सदर्न बर्ड विंग्ज 

४) केरळ – मलबार ब्रँडेड पिकॉक

Contact Us

    Enquire Now