गुलाब चक्रीवादळ

गुलाब चक्रीवादळ

  • २४ सप्टेंबरला बंगालच्या आखातामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘गुलाब‘ या गंभीर (severe) प्रकारातल्या चक्रीवादळाची निर्मिती झाली.
  • पाकिस्तानने या चक्रीवादळाचे नामकरण केले.
  • ताशी ९५ किलोमीटर्स वेग असणाऱ्या या चक्रीवादळाने दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्रप्रदेश या प्रदेशांना प्रभावित केले.
  • २६ सप्टेंबरला आंध्रप्रदेशाच्या पूर्व किनार्‍यावर गुलाबने धडक मारली.(landfall)
  • त्यानंतर पश्चिमेकडे सरकताना त्याची शक्ती हळूहळू कमी होत गेली परंतु अरबी समुद्रामध्ये गेल्यानंतर उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे एक ऑक्टोबरला पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन नवीन ‘शाहीन’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली.
  • शाहीन हे नाव कतार देशाने दिलेले असून अरेबिक भाषेत त्याचा अर्थ बहिरी ससाणा होतो.
  • ओमान या देशावर सदर चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला.
  • साधारणपणे उत्तर हिंदी महासागरात (विशेषतः बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र)एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची निर्मिती होते.
  • मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ हे तीव्र स्वरूपाचे आणि विनाशकारी असतात.
  • २०२१ वर्षामध्ये तौक्ते आणि यास चक्रीवादळांना भारताने तोंड दिल्यानंतर गुलाब हे निर्माण होणारे असे तिसरे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे.
  • उत्तर हिंदी महासागर विभागामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना १३ आशियाई देश नावे देतात.
  • प्रत्येक देश १३ नावं अशी एकूण १६९ नावे दरवर्षीच्या यादीत असतात.
  • भारतातर्फे भारतीय हवामान विभाग चक्रीवादळांना नावे देतो.
देश नाव
बांगलादेश निसर्ग
भारत गती
इराण निवार
मालदीव बुरेवी
म्यानमार तौक्ते
ओमान यास
पाकिस्तान गुलाब
कतार शाहीन
सौदी अरेबिया जावद
श्रीलंका असानी
थायलंड सतरंग
संयुक्त अरब अमिराती मांडस
येमन मोचा

Contact Us

    Enquire Now