गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

  • राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणारे २०१८-१९ या वर्षातील कला क्षेत्रातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर करण्यात आला.
  • पाच लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे.

गुलाबबाई संगमनेरकर यांच्याविषयी :

  • या सध्या ८८ वर्षांच्या असून त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून तमाशात काम करायला सुरुवात केली.
  • कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.
  • लता मंगेशकर यांच्या ‘लताबाईंच्या आजोळची गाणी’ या अल्बममध्ये त्यांनी काम केले आहे.
  • रज्जो नावाच्या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

मधुवंती दांडेकर यांच्याविषयी :

  • यांनी वयाची सत्तरी ओलांडली असून संगीत रंगभूमीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. बालगंधर्व हे त्यांचे आदर्श होते. एकच प्याला, मानापमान, कृष्णार्जुनयुद्ध, संशयकल्लोळ, झाला महार पंढरीनाथ, सौभद्र आणि स्वयंवर यांसारख्या प्रसिद्ध संगीत नाटकामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Contact Us

    Enquire Now