गुजरात सरकारची वतन प्रेम योजना

गुजरात सरकारची वतन प्रेम योजना

  • गुजरात सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी वतन प्रेम योजनेची सुरुवात केली.
  • ही योजना गुजरातमधील अनिवासी भारतीय तसेच मूळ गुजराती लोक जे भारतात इतरत्र राहत आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावामध्ये विकास प्रकल्प राबविण्यासाठी निधीचा पुरवठा करण्यास प्रोत्साहित करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्य सरकार डिसेंबर २०२२ पर्यंत १००० कोटी रुपयांचे लोककल्याणकारी विकास प्रकल्प राबविणार आहे.
  • निधी वाटपात देणगीदार किमान ६० टक्के उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारद्वारा दिला जाईल.

योजनेसंबंधित इतर महत्त्वाच्या बाबी :

  • सदर योजनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी व सदस्यांमध्ये गुजरात राज्याचे मंत्री, नोकरशहा व अनिवासी गुजराती फाउंडेशनचे अध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • तसेच ग्रामीण भागातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून समावेश असेल.
  • योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात येईल.
  • तसेच देणगीदारांच्या सुलभतेसाठी पेमेंटची व्यवस्था स्वतंत्र बँक खाते, पोर्टल तसेच ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली आहे.
  • प्रश्नांचे निवारण आणि माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी २४×७ कॉल सेंटर्सची सुविधाही करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर राबविले जाणारे उपक्रम

१) ग्रंथालये आणि शाळांमध्ये स्मार्ट वर्ग

२) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी

३) सीसीटीव्ही यंत्रणा

४) पाण्याचा पुनर्वापर, निचरा, सांडपाण्यावर प्रक्रिया तसेच तलावांचे

५) बस थांबा तसेच कम्युनिटी हॉल

६) सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे

मदर-ए-वतन योजना (२०२०) :

  • वतन प्रेम योजना ही गुजरात सरकारच्या मदर-ए-वतन योजनेची पुनरावृत्ती आहे.
  • सदर योजनेच्या नावाचा फारसी भाषेशी संबंध असल्यामुळे तिच्या नावात बदल करण्यात आला आहे.
  • यात राज्य सरकार व अनिवासी भारतीयांचा वाटा ५०:५० असे होते. जे नव्या योजनेत ६०:४० असे करण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now