ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

  • फूटबॉलमधील स्टार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगाल विरुद्ध आयर्लंड सामन्यात दोन गोल करत

          आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्याचा गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

  • रोनाल्डोने या १८०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात १११वा गोल केला.
  • त्याच्या या कामगिरीने त्याने इराणचा फूटबॉल खेळाडू अली डाएईला मागे टाकले आहे.
  • अलीने १४९ सामन्यात १०९ गोल केले होते.

महत्त्वाचे

  • रोनाल्डो व अली ह्या दोनच खेळाडूंनी त्यांच्या देशासाठी फूटबॉलमध्ये १०० हून अधिक गोल केले आहेत.

रोनाल्डोची क्लब स्तरावरील कामगिरी:

  • त्याने चॅम्पियन्स लीगमध्येही सर्वाधिक गोल केले असून त्याच्या नावावर १३४ गोल आहेत.
  • तर युरोपियन लीगमध्येही सर्वाधिक १४ गोल्स रोनाल्डोने केले आहेत.

रोनाल्डोची सुरुवात 

    • २००३ मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात झाली.
    • २००३ ते २००९ दरम्यान रोनाल्डोने युनायटेड संघासोबत आठ महत्त्वाचे पुरस्कार जिंकले होते.
    • २००९ ते २०१८ पर्यंत स्पेनचा दिग्गज क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता.
    • २०१८ ते २०२१ दरम्यान जुव्हेंटस क्लबकडून खेळत असताना आता पुन्हा मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

 

सन्मान :

 

    • २०२१ – सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड
    • २००८, २०१३, २०१४, २०१६, २०१७ – फिफा बॅलोन डीओर
    • २००७-०८, २०१०-११, २०१३-१४, २०१४-१५ : युरोपियन गोल्डन शूज
    • २०१६, २०१७ : सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू
    • २०१८ : फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर

 

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारे खेळाडू

 

क्रमवारी खेळाडू देश गोल सामने
ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल १११ १८०
अली डाएई इराण १०९ १४९
मुख्तार मलेशिया ८९ १४२
लिओनेल मेस्सी अर्जेंटिना ७६ १४९
१३ सुनील छेत्री भारत ७४ ११८

Contact Us

    Enquire Now