कोविड -19 लसीकरण कार्यक्रमाची चार राज्यांमध्ये रंगीत तालीम यशस्वी!

कोविड -19 लसीकरण कार्यक्रमाची चार राज्यांमध्ये रंगीत तालीम यशस्वी!

  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्रालयाच्या वतीने दि. 28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातल्या चार राज्यांमध्ये कोविड – 19 लसीकरण कार्यक्रम कसा राबवायचा याची रंगीत तालीम यशस्वी करण्यात आली.
  • यामध्ये आसाम, आंध्रप्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांचा समावेश आहे.
  • यूपीआय म्हणजेच वैश्विक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आणि संपूर्ण देशभरामध्ये व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे.
  • देशात ज्याप्रमाणे एमआर-गोवर-कांजिण्या तसेच मेंदूज्वर यासारख्या आजारांवर लसीकरण मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत, त्या अनुभवाच्या आधारे लोकसंख्येचा विचार करून लसीकरण करताना प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.
  • यामध्ये कोविड-19 विरोधातील लस देताना सर्वप्रथम आघाडीवर कार्य करणारे आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कामगार आणि 50 वर्षांवरील व्यक्तींचा आधी विचार करण्यात येणार आहे.

कोविड – 19 लसीकरण कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्याचा उद्देश

  • लसीकरण कार्यक्रमाची प्रक्रिया निश्चित करताना त्याचे नियोजन आणि पूर्वतयारी करणे.
  • प्रत्यक्षात कार्यक्रम राबविताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.
  • लसीकरणासाठी सोयी सुविधांची निर्मिती करणे, यासाठी CO-WIN अर्ज उपलब्ध करून देणे.
  • ज्या भागात लसीकरण करायचे आहे, त्या स्थानांच्या नोंदी, तिथे आवश्यक असणारे आरोग्य दक्षता कर्मचारी (HCW) यांची माहिती अपलोड करणे.
  • जिल्ह्यांना किती लसी देण्याची आवश्यकता आहे, त्यापैकी किती दिल्या जातील किती लसींचे वितरण झाले, या संदर्भातले नियोजन करणे.
  • लसीकरण करणाऱ्या पथकाला तैनात करणे.
  • ज्या भागामध्ये लसीकरण सुरू आहे, तेथे लसींचा पुरवठा सुरळीत ठेवणे, या संपूर्ण कामाचा आढावा घेणे.
  • हा संपूर्ण कार्यक्रम ‘CO-WIN’ या आयटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • CO-WIN ॲपद्वारे लसीकरणाची रंगीत तालीम कशा प्रकारे असेल?
  • हा सराव करताना CO-WIN ॲपमध्ये लस घेणाऱ्याचे नाव नोंदवले जाईल.
  • त्या संबंधित व्यक्तीला या ॲपच्या माध्यमातून लस टोचून घेण्याची वेळ, ठिकाण, दिवस कळविला जाईल.
  • लस टोचण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये 25 कर्मचारी या रंगीत तालमीत उपस्थित रहातील.
  • ज्याला लस टोचली आहे त्याला नंतर अर्धा तास एका खोलीत निरिक्षणाखाली ठेवले जाईल.
  • लस टोचल्यावर संबंधित व्यक्तिच्या प्रकृतिवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्‍टर लक्ष देतील.
  • दिवसभरात किती लोकांना केंद्रामध्ये लस टोचण्यात आली याची नोंदही CO-WIN ॲपच्या माध्यमातून ठेवली जाईल.
  • लसीकरणाची रंगीत तालीम प्रत्येक राज्याच्या दोन जिल्ह्यांत पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी हा सराव केला जाईल.

तीन टप्प्यात रंगीत तालीम

  • या रंगीत तालमीमध्ये चारही राज्यांत मिळून एकूण 125 आरोग्य सेवक लाभार्थी म्हणून सहभागी होणार आहेत.
  • 3 टप्पे – 1. नोंदणी 2. मायक्रोप्लॅनिंग
  • 3. प्रत्यक्ष लसीकरण
  • या रंगीत तालमीमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सआधारे राज्य आणि जिल्हा टास्क फोर्स सहभागी होतील.
  • चार राज्यांतील रंगीत तालीम ही जिल्हा हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज इथे राबवली जाईल.
  • या दरम्यान कोणतीही लस दिली जाणार नाही, परंतु लसीकरणाच्या वेळी जशी प्रक्रिया पार पाडली जाते. तशीच प्रक्रिया पार पाडली जाईल.

लसीची साठवणूक व वाहतुकीवरील लक्ष

  • केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, केवळ लोकांना लस टोचणे हीच गोष्ट नव्हे तर, लसीची शीतगृहांमध्ये साठवणूक करणे, त्या लसीची व्यवस्थित ने-आण करणे या गोष्टींकडेही विशेष लक्ष दिले जाईल.
  • कोरोना लसीकरणासाठी 29 हजार कोल्ड चेन पॉइंट, 240 वाॅक इन कुलर, 70 वॉक इन फ्रिज, 45 हजार आइस लाइन रेफ्रिजरेटर, 41 हजार डीप फ्रिजर, आणि 300 सोलर रेफ्रिजरेटर यांचा वापर केला जाईल.
  • लसीच्या वाहतुकीसाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे.
  • लसीचा वापर करेपर्यंत लसीला प्रखर सूर्यप्रकाश लागणार नाही, लस विशिष्ट तापमानात सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली जाणार आहे.
  • ठीकठिकाणी फ्रिन व्यतिरिक्त निवडक लसी एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेण्यासाठी आइस पॅकचा वापर केला जाईल.
  • या रंगीत तालमीनंतर मिळालेल्या अभिप्रायांचा आणि आलेल्या प्रतिक्रियांचा विचार करून प्रत्यक्ष लक्ष देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम प्रत्यक्ष राबविण्यास बळकटी येणार आहे.

Contact Us

    Enquire Now