कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत

  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली आहे.
  • राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत देण्यात येणार आहे.
  • कोरोनाविषयक मदतकार्ये आणि कोरोना महासाथ रोखण्यासाठीच्या पूर्वतयारीच्या कामांत सहभागी झालेल्यांचा मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या नातेवाईकांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे.
  • पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील कोरोनाबळीबरोबरच यापुढेही या विषाणूमुळे मृत्यू झाल्यास मदत मिळणार आहे.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण/जिल्हा प्रशासनाकडून या निधीचे वाटप करण्यात येईल.
  • राज्य प्राधिकरणाद्वारे देण्यात येणारा अर्ज भरून कोरोनाबळीच्या वारसांना मदतीचा लाभ घेता येईल, मात्र त्यासाठी मृत्यूचे कारण ‘कोविड १९’ असे नमूद असले पाहिजे.
  • आरोग्य मंत्रालय व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मृत्यूचे कारण ‘कोविड १९’ असे असेल तरच ह्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.
  • सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर ३० दिवसांत थेट बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येईल.
  • अर्जभरणा, पडताळणी, मंजुरी आणि निधीवाटप ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून केले जाईल.

Contact Us

    Enquire Now