केंद्राप्रमाणे राज्यातही नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहाची योजना

केंद्राप्रमाणे राज्यातही नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहाची योजना

  • “नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह” या केंद्र पुरस्कृत योजनेत राज्य सरकारही सहभागी होणार आहे.
  • मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच जिल्ह्यांच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांसाठी ५० वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • मुंबई उपनगर जिल्ह्यात ६, मुंबई शहरात ४, ठाणे जिल्ह्यात ४, पुण्यात ४ आणि राज्यातील अन्य ३२ जिल्ह्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे महिलांसाठी वसतिगृह उभारले जाणार आहेत.
  • प्रत्येक वसतिगृहाची क्षमता १०० असेल.
  • यापूर्वी ही योजना केंद्र आणि स्वयंसेवी संस्था यांच्या ७५ : २५ अशा सहभागातून राबविण्यात येत होती.
  • पण आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी वा वसतिगृहाची इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून अनुदान देण्याची सुधारित योजना राबविण्यात येत आहे.
  • या योजनेत केंद्र, राज्य, स्वयंसेवी संस्था यांच्या हिश्शाचे प्रमाण अनुक्रमे ६०:१५:२५ असे असेल.
  • नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहात ३० टक्के जागा राखीव असतील.

Contact Us

    Enquire Now