एनएफएचएस – ५ च्या निष्कर्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रिती पंत पॅनेल

एनएफएचएस – ५ च्या निष्कर्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रिती पंत पॅनेल

  • आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – ५ मधील विपरित निकर्ष्यांचे परीक्षण करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ गट स्थापन केला आहे.
  • या गटाच्या अध्यक्षा सहसचिव प्रिती पंत असून त्यात औषध आणि पोषण तज्ज्ञांचा समावेश आहे.
  • तज्ज्ञगटामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील राज्य कार्यक्रम अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे.
  • ही समिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ च्या निष्कर्षांची तपासणी करेल तसेच अशक्‍तपणा, कुपोषण, सी-सेक्शन आणि स्टंटिंगशी संबंधित निर्देशकांवर सुधारणा करण्यासाठी धोरणे आणि कारवाईचे मार्ग सुचवेल.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – ५

  • १२ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी २०१९-२० मधील ५ व्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या पहिल्या टप्प्यातील पत्रक प्रकाशित केले.
  • पत्रकात २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता आणि त्यात कुटुंब कल्याण, लोकसंख्या, पोषण, पुनरुत्पादक आणि मुलांचे आरोग्य यांसारख्या १३१ निर्देशकांची माहिती देण्यात आली होती.
  • राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – ५ च्या आधी १९९२-९३, १९९८-९९, २००५-०६ आणि २०१५-१६ या वर्षात चार सर्वेक्षण केले गेले.
  • इंटरनेशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) मुंबईतर्फे NFHS च्या सर्व फेऱ्या घेण्यात आल्या.
  • सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे आणि मे २०२१ पर्यंत जाहीर होईल.
  • समितीची आतापर्यंत कोणतीही बैठक आयोजित केलेली नाही आणि पहिल्या सभेसाठी कोणतीही तारीख निश्चित केली गेली नाही.

निष्कर्ष 

  • सर्वेक्षणात १३० पेक्षा जास्त घटकांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा डेटा उपलब्ध आहे.
  • मागील पिढीपेक्षा २०१४ आणि २०१९ दरम्यान जन्मलेली मुले अधिक कुपोषित आहेत.
  • भारतातील बहुतेक राज्यांमध्ये बालमृत्यू आणि अर्भकमृत्यु दरामध्ये घट झाली आहे.
  • सिक्कीम, आसाम, गोवा आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये नवजात मृत्यूदर (NMR), बालमृत्यूदर (IMR) आणि पाच वर्षांखालील मृत्यूदर (यू ५ एमआर) मध्ये घसरण झाली.
  • मेघालय, मणिपूर, अंदमान आणि ५ वर्षाखालील मृत्यूदर या तिन्ही प्रकारात बालमृत्यूंची संख्या वाढली आहे.
  • सर्व सर्वेक्षण झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी बिहारमध्ये तीनही प्रकारांमध्ये बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले तर केरळमध्ये सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे.
  • गोवा, केरळ, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये चाइल्ड स्टंटिंगचे प्रमाण अधिक बिकट झाले.
  • अहवालात महिला आणि गर्भवती महिलांमध्ये अशक्‍तपणाच्या पातळीत होणाऱ्या वाढीवरही प्रकाश टाकण्यात आला.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाविषयी

  • केंद्रीय मंत्री – हर्षवर्धन
  • राज्यमंत्री – आश्विनी कुमार चौबे

Contact Us

    Enquire Now