ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020

ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020

  • जाहीर करणारी संस्था – सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई)
  • सुरुवात – 2018 
  • आवृत्ती – दुसरी
  • अहवालाचे शीर्षक – स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्न्मेंट, 2021
  • अहवालानुसार कर्नाटकची राजधानी बंगळूरू 66.7 गुणांसह भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य राजधानी शहर ठरले आहे.
  • शीर्ष 10 उत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये 3 राजधानी शहरांचा समावेश होतो.
  • अहवालानुसार प्रथम 3 राजधानी शहरांचा समावेश होतो.

अहवालानुसार प्रथम 3 राजधानी शहरे व त्यांचे गुण :

राजधानी शहर गुण
बंगळुरू, कर्नाटक 66.7
चेन्नई, तामिळनाडू 62.61
शिमला, हिमाचल प्रदेश 60.9

निकष:

क्र निकष आयाम सर्वोत्कृष्ट शहर सर्वात वाईट शहर
1 राहणीमानाची गुणवत्ता
  1. शिक्षण
  2. आरोग्य
  3. घर
  4. संरक्षण
  5. गतिशीलता
  6. करमणूक
  7. घनकचरा व्यवस्थापन
पणजी श्रीनगर
2 आर्थिक क्षमता
  1. आर्थिक विकासाची पातळी
  2. आर्थिक संधी
बंगळूरू कोहीमा
3 शाश्वतता
  1. पर्यावरण
  2. ऊर्जेचा वापर
  3. शहराची लवचिकता
  4. हरित जागा व इमारती
शिमला इंफाळ
4 नागरिकांचा अभिप्राय
  1. प्रशासकाची भूमिका
भुवनेश्वर दिल्ली

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देशाची निम्नतम पातळी

  1. भारतात फक्‍त 28% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.
  2. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, लक्षद्वीप तसेच अंदमान-निकोबार येथे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही.
  3. 13 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 20%, 7 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 20-50%, तर फक्त 5 राज्य व केंद्रशासित प्रदेशात 50% हून अधिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.   
  • फेब्रुवारी 2021 मध्ये गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020 च्या यादीतही बंगळूरू प्रथम असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (Centre for Science and Environment-CSE)

  • स्‍थापना – 1980
  • संस्थापक – अनिल अग्रवाल
  • मुख्यालय – नवी दिल्ली
  • महासंचालक – सुनिता नारायण

Contact Us

    Enquire Now