इ-कचरा निर्मितीत भारत जगात तिसरा

इ-कचरा निर्मितीत भारत जगात तिसरा

  • जगभरात २०१९ या वर्षांत ५३.६ मिलियन टन इ-कचरा निर्माण झाल्याचे Global E-Waste Monitor Report-२०२० या अहवालात म्हटले आहे.
  • हा अहवाल संयुक्त राष्ट्र विद्यापीठ (UNU), Global E-waste Partnership, UNEP, आंतरराष्ट्रीय घन कचरा संघटना (ISWA) या संस्थांनी बनवला आहे.
  • या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त इ-कचरा निर्माण करणार्‍या देशांमध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो. चीनने २०१९ वर्षांत १०.१ मिलियन टन इ-कचरा निर्माण केल्याचे आढळून आले आहे. त्या खालोखाल युनायटेड स्टेट्स् आणि भारत यांनी अनुक्रमे ६.९ मिलियन टन आणि ३.२ मिलियन टन कचरा निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे.

अहवालातील निरीक्षणे :

१) एकूण इ-कचर्‍यापैकी फक्त १७.४ % कचर्‍यावरच प्रकिया होऊन त्याचा पुनर्वापर.

२) जगात इ-कचरा निर्मितीत आशिया खंड प्रथम स्थानावर (२४.९ मिलियन टन)

३) त्यानंतर दोन्ही अमेरिका (१३.१ मिलियन टन), युरोप (१२ मिलियन टन) आणि आफ्रिका (२.९ मिलियन टन) यांचा क्रमांक.

४) एकूण इ-कचर्‍यापैकी १७.४ मिलियन टन लहान यंत्रे आहेत १३.१ मिलियन टन मोठी यंत्रे आहेत. तसेच तापमान विनिमय करणारी यंत्रे १०.८ मिलियन टन इतकी आहेत.

५) २०१५ च्या तुलनेत इ-कचर्‍यात २१% ने वाढ झालेली आहे.

६) रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलित यंत्रणा यांच्यात होणारे बिघाड दुरुस्त न केल्यामुळे वातावरणात ९८ मिलियन टन कार्बन डायऑक्साइड सोडला गेला आहे.

  • इ-कचर्‍याच्या प्रक्रियेसंबंधी कायदेशीर कार्यक्रम करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश ठरला आहे.

Contact Us

    Enquire Now