इराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले

इराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले

  • चाबहार ते जाहेदान या ६२८ किमी रेल्वे प्रकल्पातून भारताला हटवल्यानंतर इराणने पर्शियन गल्फमधील फरजद-बी वायू प्रकल्पातून भारताच्या ओएनजीसीला वगळले आहे.
  • फरजद-बी वायूप्रकल्पाविषयी :
  • पर्शियन गल्फमधील फरजद-बी वायू प्रकल्प गॅस क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येत आहे.
  • या ब्लॉकमध्ये २१.३ ट्रिलियन घनफूट वायूचा साठा आहे. हा प्रकल्प दहा वर्षांपासून सुरू असून त्यांची चीनशी जवळीक वाढल्याने इराणने भारताला या प्रकल्पातून वगळले आहे.
  • ओएनजीसी, ऑईल इंडिया आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांनी २००८ साली पर्शियन गल्फमध्ये फरजद बी वायू क्षेत्राचा शोध लावला. या प्रकल्पासाठी इराणसोबत ओएनजीसीचा करार झाला होता. आता हा प्रकल्प इराणने स्वत:च पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

Contact Us

    Enquire Now