इनपुट टॅक्स क्रेडिट

इनपुट टॅक्स क्रेडिट

  • जीएसटी नेटवर्कने म्हटले आहे की त्याने वस्तू आणि सेवा करांतर्गत नोंदणीकृत ६६,००० व्यवसायांचे १४,००० कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) अवरोधित केले आहे.
  • केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये जीएसटी नियमांमध्ये कलम ८६अ आणले ज्यानुसार ‘विश्वसनीय कारण’ असल्यास करदात्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये उपलब्ध आयटीसी ब्लॉक करण्याचे अधिकार अधिकार्‍यांना मिळाले.

“इनपूट टॅक्‍स” म्हणजे काय?

  • इनपूट टॅक्‍स म्हणजे केंद्रीय कर (CGST), राज्य कर (SGST), एकात्मिक कर (IGST) किंवा केंद्रशासित प्रदेश कर (UTGST), जो नोंदणीकृत व्यक्‍तीला करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठ्यांवर आकारला जातो. यामध्ये रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेला कर आणि वस्तूंच्या आयातीवर आकारलेले एकात्मिक कर (IGST), वस्तू/माल आणि सेवा कर यांचा समावेश आहे. संयुक्‍त कर आकारणी अंतर्गत अदा केलेला कर यात अंतर्भूत नाही.

जीएसटी नेटवर्क(GSTN)

  • वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (किंवा जीएसटीएन) एक ना नफा, बिगर सरकारी संस्था आहे. हे जीएसटी पोर्टलची संपूर्ण आयटी प्रणाली व्यवस्थापित करेल.सरकार या पोर्टलचा वापर प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी आणि करदात्यांना नोंदणीपासून कर भरण्यापर्यंत सर्व सेवा प्रदान करण्यासाठी आणि सर्व कर तपशील राखण्यासाठी करते.
  • यात ५१% वाटा खासगी क्षेत्राचा आहे.

Contact Us

    Enquire Now