आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी अशोक लवासा

आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी अशोक लवासा

    • माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आशियाई विकास बँकेच्या (Asian Development Bank) उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
    • अशोक लवासा हे १९८० च्या तुकडीतील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
    • २३ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळला होता आणि ते ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून काम पाहणार होते.
    • अशोक लवासा आता ADB चे उपाध्यक्षपद भूषवतील. ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त दिवाकर गुप्ता यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली.
    • ADB ने लवासा यांना खासगी क्षेत्राचे संचालन आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
    • निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा हे केंद्रीय वित्त सचिव म्हणून नियुक्त झाले.
    • त्याआधी ते पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव होते.
    • लवासा यांनी पॅरिस करारासाठी हवामान बदलांच्या चर्चेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानास अंतिम रूप देण्यात मोलाची भूमिका बजावली, ज्यात खासगी क्षेत्राचा समावेश होता.

 

  • एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB)

 

  • मुख्यालय – मनिला, फिलीपाईन्स
  • अध्यक्ष – मसात्सूमू असाकावा
  • भारतीय निवडणूक आयोग – कलम ३२४
  • निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी व स्वतंत्र आयोग आहे.
  • स्थापना – २५ जानेवारी १९५०
  • त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • महाराष्ट्रात २०१७ पासून ५ जुलै हा दिवस ‘राज्य मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

निवडणूक आयोग रचना

  • एक मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांना सहाय्य करण्यासाठी काही सहाय्यक निवडणूक आयुक्त असतात. सहाय्यक निवडणूक आयुक्तांची संख्या वेळोवेळी राष्ट्रपती निश्चित करतात.
  • नियुक्ती – राष्ट्रपती
  • कार्यकाल – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांचा कार्यकाल ६ वर्षे/६५ वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल इतका असतो.
  • निवडणूक आयुक्तांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांइतका असतो.
  • राजीनामा – राष्ट्रपती

Contact Us

    Enquire Now