आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2022 मध्ये आता 10 संघ

 आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2022 मध्ये आता 10 संघ-

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये दोन वाढीव संघांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.
  • त्यामुळे 2022 मध्ये होणारे IPL हे 10 संघांचे असेल मात्र 2021 मधील 8 संघांचेच असेल.
  • 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट (T-20) ला स्थान मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीतील यावर्षीचे आयपीएल संपल्यानंतर पुढील स्पर्धेसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.
  • आयपीएलमध्ये ज्या शहरातील किंवा राज्यातील संघ आहेत त्याच ठिकाणाचे नवे दोन संघ नसावेत यावरही एकमत झाले आहे.
  • नवीन संघ अहमदाबाद, राजकोट, विशाखापट्टणम्‌, कोचीतिरुअनंतपुरम किंवा लखनऊ या शहरातून असतील.
  • याआधी ‘पुणे वॉरियर्स इंडिया’ व ‘कोची टस्कर्स केरला’ 2010 मध्ये 9 वा व 10 वा संघ होता, परंतु 2011 मध्ये कोची टस्कर्स व 2013 मध्ये पुणे वॉरियर्स यांना वगळण्यात आले.
  • 2015 साली ‘चेन्नई सुपर किंग्स’ व ‘राजस्थान रॉयल्स’ या दोन संघांना मॅच फिक्सिंग अंतर्गत निलंबित करण्यात आले. व त्या कालावधीत त्यांच्या जागी ‘रायझिंग पुणे सुपरजायंट’ व ‘गुजरात लॉयन्स’ या नवीन संघांना तात्पुरते घेण्यात आले होते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)-

  • 2008 साली बीसीसीआय अंतर्गत आयपीएलची स्थापना झाली. त्या वर्षीपासूनच दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
  • आयपीएल क्रिकेट स्पर्धांमधील सर्वाधिक हजेरी प्रेक्षक असलेली स्पर्धा आहे.
  • 2020 यावर्षीचा विजेता संघ– ‘मुंबई इंडियन्स’.
  • सर्वाधिक विजेता संघ- 1. मुंबई इंडियन्स– 5 वेळा.  2. चेन्नई सुपर किंग्स– 3 वेळा.
  • सर्वाधिक धावाविराट कोहली (5878 धावा).
  • सर्वाधिक बळीलसिथ मलिंगा (170 बळी).

Contact Us

    Enquire Now