आयएइएने आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नयेत : इराण

आयएइएने आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नयेत इराण

  • युरेनियमचे समृद्धीकरण करणे हे जुनेच उद्दिष्ट असल्याचा दावा करणाऱ्या इराणने आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत गोंधळ निर्माण होईल असे अनावश्यक तपशील जाहीरपणे प्रसिद्ध करू नयेत, असे संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षण संस्थेला सांगितले आहे.
  • ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या युरोपीय देशांनी नागरी वापरासाठी युरेनियमचा वापर करण्यास मंजुरी नसतानाही युरेनियमचे समृद्धीकरण करून २०१५च्या शांतता कराराचा भंग न करण्याचे आवाहन इराणला केले आहे.
  • युरोपातील या प्रमुख देशांनी आवाहन केल्यानंतरही इराणने आपली भूमिका आक्रमक ठेवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेकडून (आएइए) इराणची झाडाझडती व निरीक्षण केल्या जात आहे.
  • या संदर्भात इराणने एक निवेदन जारी करत ‘आएइए’ने आमच्या आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील पुरवू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समदात्यामध्ये गैरसमज निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यास प्रतिबंध करावयास सांगितले आहे.
  • दरम्यान इराणनेच आपल्याला माहिती दिल्याचा दावा ‘आएइए’द्वारे करण्यात आला होता. इंधनाचा सुधारित प्रकार बनविण्यासाठी आणि युरेनियम धातूच्या उत्पादनांची यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी साधनसामुग्री बसवली जात आहे, असे इराणने दिलेल्या माहितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले. युरेनियम धातूवर संशोधन आणि विकास करण्यासाठीची योजना पुढे नेली जात असल्याचेही यामध्ये नमूद आहे.

इराणने नमूद केलेले मुद्दे

  1. ऑक्साईडजन्य युरेनियमचा वापर इंधन म्हणून आण्विक प्रकल्पांमध्ये करणार.
  2. युरेनियम धातू युरेनियम सिलिसाइडच्या उत्पादनात महत्त्वाचे माध्यम
  3. जास्त सुरक्षित आणि शक्‍तिशाली असलेल्या युरेनियम सिलीसाइडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील
  4. दोन दशकांपूर्वीच संबंधित संस्थेला युरेनियम धातूचे शांततापूर्वक आणि पारंपरिक मार्गाने उत्पादन करण्याच्या योजनेबाबत माहिती दिली.
  • मात्र या समृद्ध युरेनियमचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासही होऊ शकतो. त्यामुळे युरेनियम समृद्ध करण्यास अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या सहा देशांनी नकार दिला होता. दरम्यान युरेनियमचे उत्पादन करण्यासाठी इराणकडून यंत्रणा उभारली जात असल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. तेव्हा हा गोंधळ टाळण्याच्या उद्देशाने आणि तपशील जाहीर न करण्यास इराणने निरीक्षण संस्थेस ठणकावले आहे.

Contact Us

    Enquire Now