आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा

आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
  • या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना वीज दर, विद्युत शुल्क, पाणीपट्टी मालमत्ता कर यामध्ये सवलत मिळणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून १ एप्रिल २०२१ पासून वीज दर, वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर, विकास कर व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने होईल.
  • केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून औद्योगिक दराने कर/शुल्क आकारणी करण्यासाठी निकष ठरवण्यासाठी एक तज्ज्ञ  समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निकषांची पूर्तता करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना औद्योगिक दराने कर/शुल्क आकारणी लागू करण्यात येईल.

Contact Us

    Enquire Now