आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताला १२.५७ अब्ज एसडी वितरित

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताला १२.५७ अब्ज एसडी वितरित

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMR – International Monetary Fund) भारताला ऑगस्ट २०२१ मध्ये १२.५७ अब्ज एसडीआर (SDR – Special Drawing Rights) वितरित करण्यात आले.
  • ही भारताला वितरित करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.

काय आहे एसडीआर आणि त्याचे फायदे

  • आपल्या सदस्य राष्ट्रांच्या सरकारी राखीव निधीला पूरक म्हणून SDRची निर्मिती १९७१ मध्ये करण्यात आली.
  • SDR हे चलन नाही मात्र त्याचा वापर चलनासारखा होऊ शकतो. त्यांचा विनिमय इतर चलनाच्या संदर्भात केला जातो. त्यांना ‘कागदी सोने’ असेही म्हणतात.
  • SDRची किंमत डॉलर, पाऊंड, यूरो, येन आणि रेनमानवी यासंदर्भात मोजली जाते.
  • एखाद्या राष्ट्राच्या कोट्याच्या आधारावर त्या राष्ट्राला SDR वितरित केले जातात. कोटा म्हणजेच IMFच्या एकूण भांडवलातील वाटा. भारताचा हा वाटा २०१६ मध्ये २.७८ टक्के इतका आहे. दर पाच वर्षांनी याचे पुनरवलोकन केले जाते.

SDRचे फायदे

  • SDRचा वापर कसा केला जातो यासाठी कोविड-१९ लसीचे उदाहरण घेऊया. समजा IMFने भारताला काही SDR वितरित केले तर ते SDR भारत इतर देशांबरोबर विनियोग करेल व त्यायोगे परदेशी चलन प्राप्त करेल. हे परकीय चलन वापरून भारत कोविड-१९ लस आयात करू शकेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF-International Monetary Fund)

  • स्थापना – २७ डिसेंबर १९४५
  • सुरुवात – १ मार्च १९४७
  • मुख्यालय – वॉशिंग्टन डी. सी.
  • सदस्य देश – १८९ देश (१८९वा कोसोबो)
  • अध्यक्ष – ख्रिस्टालिना जॉर्जिव्हा
  • मुख्य अर्थतज्ज्ञ – गीता गोपीनाथ
  • वित्तीय वर्ष – १ मे ते ३० एप्रिल
  • स्थापनेवेळी सदस्य – २९
  • भारत IMF चा संस्थापक सदस्य आहे.

 

  • उद्देश

 

१) विनिमय दरात स्थिरता निर्माण करणे.

२) आंतरराष्ट्रीय व्यापार असमतोल दूर करणे.

३) आंतरराष्ट्रीय व्यापारवाढ प्रोत्साहन देणे.

 

  • प्रकाशने

 

१) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक (WEO)

२) फिस्कल मॉनिटर

३) ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट

Contact Us

    Enquire Now