अल साल्वाडोर बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा पहिला देश

अल साल्वाडोर बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा पहिला देश

  • अल साल्वाडोर बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारणारा पहिला देश बनला आहे.
  • म्हणजेच येथील व्यावसायिकांनी अमेरिकन डॉलरसोबत बिटकॉईनमध्ये पेमेंट स्वीकारले पाहिजे, जे २००१ पासून अल साल्वाडोरचे अधिकृत चलन आहे.
  • जून २०२१ मध्ये या देशाने औपचारिकरीत्या बिटकॉईनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारले होते.

काही महत्त्वाचे मुद्दे :

१) बिटकॉइनमध्ये प्रवेश करण्यासाठी व त्याचे चलनात रूपांतरण करण्यासाठी देशभरात २०० बिटकॉइन टेलर मशीन बसविण्यात येत आहेत.

२) अल साल्वाडोरने ‘चिवो (Chivo) किंवा कूल (Cool) नावाचे डिजिटल पाकीट लाँच केले आहे, ज्याद्वारा रूपांतरणासाठी ३० डॉलरचे मोफत बिटकॉईन दिले जाते.

फायदे

१) रेमिटन्स व्यवहारांच्या किंमतीत घट:

बिटकॉईन अल साल्वाडोरला रेमिटन्सच्या कमिशनवर ४०० दशलक्ष डॉलर्स प्रतिवर्ष बचत करण्यास मदत करेल. अल साल्वाडोरच्या एकूण जीडीपीच्या प्रमाणात रेमिटन्सचा वाटा २४ टक्के आहे.

२) आर्थिक लोकशाहीकरण:

सदर देशातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येचे बँकखाते नाही परिणामी, डिजीटल चलनाचा अवलंब केल्याने इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये लोकशाहीकरणाचा प्रवेश होईल.

३) क्रिप्टोकरन्सीमुळे ग्राहकांना अधिक पर्यायी संधी प्राप्त होऊ शकतात.

४) थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) :

अल साल्वाडोर पेमेंट प्लॅटफॉर्म डेव्हलपर, एटीएम उत्पादक, बिटकॉईन माइनर्स तसेच इतर क्षेत्रांतही एफडीआय आकर्षित करू शकतो.

चिंता:

१) कार्बन फूटप्रिंट :

देशाच्या बिटकॉइन योजनेने क्रिप्टोकरन्सीच्या पर्यावरणीय प्रभावावर प्रकाश टाकला आहे, कारण सायबरस्पेसमधून डिजिटल चलन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि बिटकॉईन उद्योगाचे जागतिक कार्बन उत्सर्जन ६० दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे.

२) केंद्रीय नियामक प्राधिकरणाची कमतरता :

यामुळे बिटकॉईनला कायदेशीर बनवताना फसवणूक, मनी लाँन्ड्रिंग, उच्च क्षमतेचा खर्च तसेच अत्यंत अस्थिरतेची शक्यता असते.

३) बिटकॉईनमधील चढउतार :

ज्या देशाचे मूल्य एका दिवसात शेकडो डॉलर्स बदलू शकते, तो देश डिजिटल चलनातील तीव्र चढउतारांशी संबंधित जोखीम कसा हाताळेल याबद्दल शंका आहेत.

बिटकाईन :

  • बिटकाईन हा क्रिप्टोकरन्सीचा प्रकार असून याचा सर्वप्रथम वापर २००८ मध्ये सातोशी नाकामोटा या नावाने वापरलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्ती गटाने केला होता.
  • क्रिप्टोकरन्सी एक विशिष्ट प्रकारचे आभासी चलन म्हणून क्रिप्टोग्राफिक इन्क्रिप्शन तंत्राद्वारे संरक्षित आहे.
  • बिटकॉईन, इथरियम, रिपल ही क्रिप्टोकरन्सीची काही महत्त्वपूर्ण उदाहरणे आहेत.
  • बिटकाईन ओपन सोर्स प्रोटोकॉलवर आधारित आहे, जे कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केले जात नाही.

Contact Us

    Enquire Now