अरुणाचल प्रदेशचे चित्रपट निर्माता ‘केझांग डी थोंगडॉक’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

अरुणाचल प्रदेशचे चित्रपट निर्माता ‘केझांग डी थोंगडॉक’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

    • अरुणाचल प्रदेशचे चित्रपट निर्माता ‘केझांग डी थोंगडॉक’ यांना ‘ची लुपो’ या लघुपटासाठी २०२०चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला.
    • केझांग डी थोंगडॉक यांनी दस्तऐवजीकरण केलेले ‘ची लुपो’ हे ‘मधशिकार’ विषयक एक लघुपट आहे.
    • ची लुपोने शेरटुक पेन समाजात वापरल्या जाणार्‍या मध शिकारची परंपरा दर्शविली ज्यामध्ये ची म्हणजे मध आणि लिपो म्हणजे शिकारी
    • मध शिकार हळुहळू कमी होत आहे आणि म्हणून ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी ‘केझांग डी थोंगडॉक’ यांनी त्यांचे दस्तऐवजीकरण केले.
    • ‘केझांग डी थोंगडॉक’ हे या पुरस्काराचे ५१वे मानकरी ठरले आहेत.

 

  • पुरस्काराबद्दल :

 

    • भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार
    • भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञानाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
    • सुरुवात – १९६९ (दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष)
    • चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा ‘राष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो.
    • पहिले विजेते – देविका राणी
    • महिला विजेत्या – 
    • देविका राणी (१९६९), रुबी मायर्स (सुलोचना) (१९७३), कानन देवी (१९७६), दुर्गा खोटे (१९८३), लता मंगेशकर (१९८९), आशा भोसले (२०००)

 

  • मरणोत्तर विजेते –

 

१) पृथ्वीराज कपूर (१९७१)

२) विनोद खन्ना (२०१७)

 

  • पुरस्कारप्राप्त भावंडे :

 

१) बॉम्मेरेड्डी नरसिम्हा रेड्डी (१९७४) आणि बॉम्मेरेड्डी नागी रेड्डी (१९८६)

२) राज कपूर (१९८७) आणि शशी कपूर (२०१४)

३) लता मंगेशकर (१९८९) आणि आशा भोसले (२०००)

४) बलदेव राज चोप्रा (१९९८) आणि यश चोप्रा (२००१)

 

  • पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन –

 

१) दुर्गा खोटे (१९८३)

२) व्ही. शांताराम (१९८५)

३) लता मंगेशकर (१९८९)

४) भालजी पेंढारकर (१९९१)

५) आशा भोसले (२०००)

 

  • केझांग डी थोंगडॉक – 

 

    • जन्म – ८ जानेवारी १९८३

 

  • दादासाहेब फाळके :

 

    • मृत्यु – १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक)
    • पूर्ण नाव – धुंडिराज गोविंद फाळके
    • भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार
    • ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात.
    • १९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एन्ग्रेव्हिंग अँड प्रिटिंग प्रेस ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. पुढे तिचेच रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिटिंग वर्क्स’ मध्ये झाले.
    • मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित झाला. (३ मे १९१३)
    • या चित्रपटानंतर त्यांनी मोहिनी भस्मासुर (१९१३), सत्यवान सावित्री (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली.
    • वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण (१९३७) हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला.
    • आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली.
    • २०१९ चे विजेते – अमिताभ बच्चन
    • पुरस्काराचे ५० वे मानकरी
    • अमिताभ बच्चन यांच्या सिनेमा क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी (५० वर्षे) वर्षीच त्यांना हा पुरस्कार मिळाला.
    • त्यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
    • ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

  • बच्चन यांना मिळालेले पुरस्कार –

 

१) चार राष्ट्रीय पुरस्कार

२) १४ फिल्मफेअर पुरस्कार

३) पद्मश्री (१९८४)

४) पद्मभूषण (२००१)

५) पद्मविभूषण (२०१५)

६) द लिजन ऑफ ऑनर (२००७  फ्रान्स)

Contact Us

    Enquire Now