अमेरिकेने जागतिक संघटनेला (UN) माघार घेण्यास सूचित केले

अमेरिकेने जागतिक संघटनेला (UN) माघार घेण्यास सूचित केले 

  • २०१९ मध्ये वुहान प्रांतातील कोविड-१९ उगम लपवण्यासाठी बीजिंग, चीनला मदत करून अमेरिकेने WHO वर ‘चीनची कठपुतली’ असा आरोप केला आहे.
  • त्यामुळे अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) माघार घेण्याबाबत औपचारिकरित्या सुचविले आहे.
  • २१ जून १९४८ पासून WHO चा भाग असणारा अमेरिका हा सर्वात मोठा निधी पुरवठा करणारा देश असून दरवर्षी ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त योगदान देतो.
  • जागतिक आरोग्य संघटनेत सामील होताना अमेरिकेने मान्य केलेल्या माघार घेण्याच्या अटींचा एक वर्षाच्या नोटीस कालावधीसह आर्थिक जबाबदार्‍या पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • यासंदर्भात अमेरिकेला नोटीस कालावधीत म्हणजे ६ जुलै २०२१ पर्यंत काम करावे लागेल.
  • या कालावधीत सध्याची व मागील थकीत २०० मिलियन डॉलर्सची थकबाकीदेखील संपविणे आवश्यक आहे.

WHO बद्दल :

  • स्थापना : ७ एप्रिल १९४८ 
  • मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड 

अमेरिकेबद्दल :

  • राजधानी : वॉशिंग्टन डीसी 
  • चलन : युनायटेड स्टेटस् डॉलर (अमेरिकन डॉलर)

Contact Us

    Enquire Now