अमेरिका व चीननंतर भारत जगातील तिसरी मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम

अमेरिका व चीननंतर भारत जगातील तिसरी मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम

  • हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट (भारत) द्वारे घोषित करण्यात आलेल्या पहिल्या हुरून इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट- २०२१ नुसार, भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम असलेला देश बनला आहे.
  • या क्रमवारीनुसार, भारतात १६४ अब्ज डॉलर्स किंमतीचे ५१ युनिकॉर्न, ३२ गॅझल (Gazelles) आणि ५४ चीता (Cheetahs) आहेत.
  • या क्रमवारीत २००० नंतर स्थापन झालेल्या, २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१५०० कोटी रुपये) मूल्य आणि अद्यापही स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध न केलेल्या स्टार्टअप्सचा समावेश करण्यात आला आहे.

हुरून इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट, २०२१:

क्र देश युनिकॉर्न (स्टार्टअप) संख्या
१. अमेरिका ३९६
२. चीन २७७
३. भारत ५१
४. ब्रिटन ३२
५. जर्मनी १८
  • युनिकॉर्न : खासगी स्टार्टअप ज्यांचे मूल्य ७३ अब्ज ८ कोटी १५ लाख (१ अब्ज डॉलर्स) पेक्षा अधिक आहे.
  • गॅझेल्स : २००० नंतर स्थापन झालेले स्टार्टअप असून त्यांचे मूल्य ५०० दशलक्ष ते १ अब्ज डॉलर्स इतके आहे. त्याचबरोबर पुढील २ वर्षांत त्यांना युनिकॉर्न दर्जा मिळू शकतो.
  • चीता : या स्टार्टअपचे अंदाजित मूल्य २०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष डॉलर्स असते व पुढील चार वर्षांत त्यांना युनिकॉर्न दर्जा मिळू शकतो.

महत्त्वाचे मुद्दे :

  • हुरून इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट, २०२१ नुसार, गॅझेल्स यादीत इ-कॉमर्स स्टार्टअप ‘झिलिंगो’ आणि मोबाईल प्रीमियर लीग (एमपीएल) यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान प्राप्त झाले आहे.
  • गॅझेलच्या यादीतील क्रिप्टोकरन्सी मधील एकमेव स्टार्टअपचा म्हणजेच कॉइनस्विच कुबेर (CoinSwitch Kuber) २९व्या क्रमांकावर आहे.
  • पेपरफ्राय (Pepperfry) २५० दशलक्ष डॉलर्ससह अव्वल स्थानाचे चीता स्टार्टअप आहे, यानंतर डीलशेअर आणि एमस्वाइप यांचा क्रमांक लागतो.
  • या यादीतील एकूण १२ स्टार्टअप हे महिलांनी सह-स्थापित केले आहेत, ज्यात ५ गॅझेल व २ चिता अशा सात स्टार्टअप्सचा समावेश आहे.
  • गुंतवणूकदार : या स्टार्टअपमध्ये ३०० हून अधिक गुंतवणूकदार आहेत, ज्यात प्रामुख्याने एंजेल गुंतवणूकदार, व्यावसायिक, कौटुंबिक कार्यालये, संस्थात्मक गुंतवणूकदारांचा समावेश होतो.
  • स्टार्ट अप्समध्ये सेक्वॉया (Sequoia) हा अव्वल गुंतवणूकदार आहे व त्यानंतर टायगर ग्लोबलचा क्रमांक लागतो.

हुरून इंडिया :

  • हा एक संशोधन, मीडिया आणि गुंतवणूक गट आहे.
  • अध्यक्ष : रुपर्ट हुगरवर्फ
  • व्यवस्थापकीय संचालक : अनस रहमान
  • मुख्यालय: मुंबई

Contact Us

    Enquire Now