अनुपालन बळकट करण्यासाठी आरबीआय वापरणार प्रिझम प्रणाली

अनुपालन बळकट करण्यासाठी आरबीआय वापरणार प्रिझम प्रणाली

  • पर्यवेक्षी संस्थांद्वारे (एसई) अनुपालन बळकट करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ‘रेग्युलेटेड एंटिटीज फॉर इंटिग्रेटेड सुपरव्हिजन अँड मॉनिटरिंग (PRISM) या वेब आधारित एंड-टू-एंड वर्कफ्लो ऑटोमेशन प्रणालीचा वापर करणार आहे.
  • प्रिझममध्ये असलेल्या कार्यक्षमता: तपासणी, अनुपालन, सायबर सुरक्षा, तक्रार निवारण, अंगभूत रिझोल्यूशन वर्कफ्लोसह पुनःप्राप्ती कार्ये, वेळ, ट्रॅकिंग, सूचना, व्यवस्थापन माहिती प्रणाली अहवाल आणि डॅशबोर्ड, इत्यादी कार्यक्षमता या ऑटोमेशन प्रणालीमध्ये असतील.
  • लक्ष: सतत देखरेखीसाठी जोखीम लवकर ओळखणे आणि पर्यवेक्षक कृतींची अंमलबजावणी करणे.
  • हेतू: एसईंना त्यांचे अंतर्गत संरक्षण व लवचिकता मजबूत करण्यासाठी व मूळ कारण विश्लेषणावर (Root Cause Analysis) लक्ष्य केंद्रित करण्यास मदत करणे.

भारतातील वित्तीय व्यवस्थेचे नियमन:

  • भारतातील वित्तीय व्यवस्थेचे नियमन व पर्यवेक्षण वेगवेगळ्या नियामक प्राधिकरणांद्वारे केले जाते.
  • आरबीआय ही शहरी सहकारी बँक, काही वित्तीय संस्था तसेच राष्ट्रीय बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनचे पर्यवेक्षण करते.
  • प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे पर्यवेक्षण राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) करते व राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (एनएचबी) ही गृहनिर्माण कंपन्यांचे पर्यवेक्षण करते.

Contact Us

    Enquire Now