अनंत मनोहर

अनंत मनोहर

जन्म – १९२९ (बेळगाव)

मृत्यू – १७ जुलै २०२१ (पुणे)

  • ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त प्राध्यापक अनंत मनोहर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
  • १९६२ ते १९८८ दरम्यान बेळगाव येथील पार्वतीदेवी महाविद्यालयात मराठी विभागात ते प्राध्यापक होते.
  • अनंत मनोहर यांनी कादंबरी, कथा, ललित, स्फुटलेखन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात ऐंशीहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत.
  • त्यांनी १९६४ मध्ये ‘वाटचाल’ या कादंबरीपासून लेखनाला सुरुवात केली होती.
  • त्यांच्या ‘अरण्यकांड,’ ‘ज्येष्ठ’, ‘सचिन तेंडुलकर समग्र चरित्र’, ‘द्वारकाविनास’ अशा कांदबऱ्यासह ‘मैत्र’, ‘राब’ असे कथासंग्रह विशेष गाजले.
  • त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यामुळे १९९२ मध्ये ‘सकाळ’साठी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विशेष वार्ताकन केले होते.
  • आखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेतही त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता.
  • ‘साप्ताहिक सकाळ’ मध्येही त्यांनी लेखन केले होते.

Contact Us

    Enquire Now