अटल बोगदा

अटल बोगदा

  • 3 ऑक्टोबर 2020 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचे उद्‌घाटन केले. 9.02 किलोमीटर लांबीमुळे हा महामार्गांवर असणारा जगातील सर्वात लांब बोगदा ठरला आहे.
  • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 3,300 कोटी रुपये खर्चून हा बोगदा उभारला आहे. अटल बोगदा हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लहौल-स्पिती व्हॅली यांना जोडतो.
  • या बोगद्यामुळे स्पिती व्हॅलीचा प्रदेश आता बर्फवृष्टी सुरू असतांनाही भारताच्या संपर्कात राहू शकेल. तर मनाली आणि लेहमधील अंतर 4 ते 5 तासांनी कमी होईल. तसेच मनाली आणि कीलॉंग यांच्यातील अंतर ही 3 ते 4 तासांनी कमी होईल.
  • अटल बोगदा ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बनवल्यामुळे दिवसाला 80 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या 3000 कार्स आणि 1500 ट्रक इतका ट्रॅफिक भार झेलू शकतो.
  • या बोगद्याची घोषणा 26 मे 2002 रोजी रोहतांग बोगदा या नावाने करण्यात आली होती. 28 जून 2010 ला भूमिपूजन झाल्यानंतर हा प्रकल्प अपूर्णच राहिला होता. 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय कॅबिनेट कमिटीने या प्रकल्पाचे नाव भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरून ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • या बोगद्याचा फायदा हिमाचलमधील स्थानिक शेतकरी, फुलांचे व फळांचे व्यापारी यांना होणार असून हिमाचलमधील मालाला दिल्लीच्या बाजारपेठेशी जोडण्यात होईल.
  • हिमाचलप्रदेश जवळच चीन आणि नेपाळची सीमा असल्याने  भारतीय लष्कराला या बोगद्यामुळे बळ मिळेल.

 

Contact Us

    Enquire Now