अग्नी – पी क्षेपणास्त्र

अग्नी – पी क्षेपणास्त्र

  • नुकतेच, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) नवीन पिढीच्या अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राइम(अग्नी-पी)’ची यशस्वी चाचणी घेतली.
  • ही दुसरी चाचणी असून जून २०२१ मध्ये सदर क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या अग्नी प्रकारामधील सुधारित असे क्षेपणास्त्र असून यामध्ये अचूकता अधिक आहे.
  • तसेच या क्षेपणास्त्रास प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा वेळ कमी असून सदर सुधारित आवृत्तीमुळे स्टोअरेज सुधारते आणि हाताळणी सुलभ होते.
  • अग्नी-पी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक प्रकारचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारा १००० ते २००० किलोमीटर्स आहे.
  • भारताचा एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) : 
  • सुरुवात : २६ जुलै १९८३
  • डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख आणि भारताचे माजी राष्ट्रपती 

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रमाची सुरुवात

  • कार्यक्रमांतर्गत पृथ्वी, आकाश, नाग, अग्नी आणि त्रिशूल ही पाच क्षेपणास्त्रे विकसित केली गेली.
  • पृथ्वी : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
  • आकाश : जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
  • नाग : तिसर्‍या पिढीचे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
  • त्रिशूल : जमिनीवरून हवेत मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र
  • अग्नी : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मध्यम ते आंतरखंडीय पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
  • २००८मध्ये वरील कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे सदर कार्यक्रमास समाप्त करण्यात आले.
  • अग्नि क्षेपणास्त्राचे सामरिक महत्त्व लक्षात घेता त्यांची बजेटमध्ये वेगळी तरतूद अजूनही केली जाते.

अग्नीच्या विकासाचे एकूण पाच टप्पे बघायला मिळतात.

क्षेपणास्त्र प्रकार पल्ला (किमी) पहिली चाचणी अग्नी -५ हे भारताकडे असणारे अणु-सक्षम आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) असून यामुळे भारत हा अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, आणि ब्रिटन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
अग्नी – १ मध्यम पल्ला ७००-९०० १९८९
अग्नी – २ मध्यम पल्ला २००० किमी पेक्षा जास्त  १९९९
अग्नी – ३ मध्यम पल्ला २५००-३००० २००६
अग्नी – ४ मध्यम पल्ला ४००० २०११
अग्नी – ५ आंतरखंडीय  ५००० किमी पेक्षा जास्त २०१२
  • सध्या अग्नी-६ विकसित करण्यात येत असून त्याचा पल्ला ८००० किलोमीटर्सपेक्षाही जास्त असेल.

Contact Us

    Enquire Now