अंतर्देशीय जहाज विधेयक, २०२१

अंतर्देशीय जहाज  विधेयक, २०२१

  • २९ जुलैला लोकसभेने अंतर्देशीय जहाज विधेयक, २०२१  पारित केले.
  •  सदर विधेयक १९१७ च्या अंतर्देशीय जहाज  विधेयकाची जागा घेईल.
  •  यापूर्वी अंतर्गत जलवाहतुकीसाठी जहाजांच्या मालकांना प्रत्येक संबंधित राज्याकडून परवानगी मिळवावी लागत होती.
  •  या विधेयकामुळे ही पद्धत बंद होऊन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी केंद्राद्वारे जारी करण्यात आलेले केवळ एक प्रमाणपत्र असेल.
  •  त्यामुळे जहाजाच्या मालकांना प्रत्येक राज्यांमधून प्रमाणपत्र मिळवण्याची गरज लागणार नाही.त्यामुळे अंतर्गत जलवाहतूक सोपी, स्वस्त होईल.
  •  यांत्रिक जहाजांना एका केंद्रीय इलेक्ट्रॉनिक डेटाबेसमध्ये त्यांच्या जहाजाची नोंदणी करणे बंधनकारक राहील.
  •  तर बिगर यांत्रिक जहाजांना संबंधित जिल्हा, तालुका, पंचायत यांमध्ये नोंदणी करावी लागेल.

 भारतातील अंतर्गत जलवाहतूक :

  • भारतामध्ये नदी, कालवे, बॅकवॉटर, खाड्या यांचे मिळून एकूण १४५००  किमीचे अंतर्गत जलमार्ग आहेत.
  •  त्यातील सध्या ४००० किमीचे  जलमार्ग कार्यरत आहेत.
  •  केंद्र शासनाने राष्ट्रीय जलमार्ग कायदा, २०१६ अनुसार १११ राष्ट्रीय जलमार्गांना मान्यता दिली आहे.
  •  राष्ट्रीय जलमार्ग १ : अलाहबाद ते हल्दिया –  हुगळी, भागीरथी, गंगा नद्या – उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्ये
  •  राष्ट्रीय जलमार्ग २ : धुब्री ते सदीया –  ब्रह्मपुत्रा नदी – आसाम
  •  राष्ट्रीय जलमार्ग ३: कोल्लम ते कोझिकोडे –  वेस्ट कोस्ट कालवा, उद्योगमंडल  आणि चंपकरा कालवा –  केरळ
  •  राष्ट्रीय जलमार्ग ४ : काकीनाडा ते पुदुच्चेरी –  बकिंगहॅम कालवा (गोदावरी नदी)- आंध्र प्रदेश
  •  राष्ट्रीय जलमार्ग ५ :  तालचेर ते  गोयंखाली –  ब्राह्मणी, धर्मा, मतई नदी- ओदिशा आणि पश्चिम बंगाल
  •  राष्ट्रीय जलमार्ग ६ :  लाखीपुर  ते  भांगा –  बराक नदी – आसाम, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा

 भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण :

  • भारतातील अंतर्गत जलमार्गाच्या विकास व नियमनासाठी २७ ऑक्टोबर १९८६ ला स्थापना
  • मुख्यालय : नोएडा
  • अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण राष्ट्रीय  जलमार्ग १  च्या विकासासाठी जागतिक बँकेच्या मदतीने राष्ट्रीय जलमार्ग विकास प्रकल्प राबवत आहे.

Contact Us

    Enquire Now