हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार अध्यादेश २०२० मंजूर
- मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटमध्ये हा अध्यादेश मसुदा मंजूर करण्यात आला. ज्यात स्थानिक उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा कमी पगार देणार्या खासगी क्षेत्रातील कंपनी, संस्था इत्यादींमध्ये ७५% जागा राखीव ठेवण्यात आल्या.
- १० पेक्षा जास्त उमेदवार असलेले रोजगार या कायद्यांतर्गत येतील.
- हरियाणा मंत्रिमंडळासमोर हा अध्यादेश पुढच्या बैठकीदरम्यान मांडण्यात येईल.
या कायद्यांतर्गत
- कंपनींना ५० हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या उमेदवाराची नोंद करावी लागेल. नोंदणी न केल्यास २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल.
- या कायद्यासाठी जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते.
अशा प्रकारचा कायदा :
- आंध्रप्रदेशमध्ये – ७५% राखीव जागा व
- महाराष्ट्रात – ५०% राखीव जागा – पर्यवेक्षी जागेवर
- ८०% राखीव जागा – पर्यवेक्षी नसलेल्या जागेसाठी.