स्विस राष्ट्रीय बँकेचा अहवाल
- सर्व बँकांसोबतचे वार्षिक व्यवहार दर्शवणारा ‘Annual Banking Statistics, २०१९’ हा अहवाल स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय बँकेने जाहीर केला आहे.
- स्वित्झर्लंड बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात भारताचा ७७वा क्रमांक लागतो. या बँकांमध्ये परकीय नागरिक आणि परकीय आर्थिक संस्था यांच्या ठेवींपैकी एकूण ०.०६% ठेवी भारतीयांच्या आहेत.
- युनायटेड किंग्डमच्या (UK) ठेवी सर्वात जास्त (२७%) असून त्या खालोखाल अनुक्रमे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांचा क्रमांक लागतो.
- भारतीय नागरिक आणि विविध उद्योगधंदे यांच्या ठेवी २०१८ च्या तुलनेत ५.८ टक्क्याने कमी झाल्या आहेत. ब्रिक्स देशांदरम्यान स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्यात भारताचा शेवटचा तर रशियाचा प्रथम क्रमांक लागतो.
- स्वित्झर्लंड राष्ट्रीय बँकेचे मुख्यालय झ्युरीक, स्वित्झर्लंड येथे आहे. थॉमस जॉर्डन हे या बँकेचे चेअरमन.
- भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांचे ह्या यादीतील क्रमांक पुढीलप्रमाणे-
-
- पाकिस्तान- ९९
- नेपाळ- ११८
- म्यानमार- १८६
- भूतान- १९६
- श्रीलंका- १४८
- बांगलादेश- ८५
THE युनिव्हर्सिटी रँकिंग
- ‘Times Higher Education (THE)’ या लंडनस्थित संस्थेने जाहीर केलेल्या ५० किंवा त्यापेक्षा कमी वर्षे जुन्या असलेल्या (तरुण) विद्यापीठाच्या यादीत भारतातील आयआयटी रोपार आणि आयआयटी इंदौर या दोन संस्थांनी जगात ६२वा व ६४वा क्रमांक पटकावला आहे.
- या यादीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, हाँगकाँग (HKUST) या संस्थेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे नानयांग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, सिंगापूर आणि पॅरिस सायन्स एत लेटर्स, फ्रान्स या विद्यापीठांनी पटकावला आहे.
- ‘Times Higher Education’ संस्था दरवर्षी विविध ९२ देशांमध्ये असलेल्या १४०० विद्यापीठांचे मूल्यांकन खालील निर्देशकांच्या आधारे करते.
- शिकवणे (३०%)
- संशोधन (३०%)
- मान्यताप्राप्त प्रशस्तिपत्रे (३०%)
- आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन (७.५%)
- औद्योगिक उत्पन्न (२.५%)