स्विस राष्ट्रीय बँकेचा अहवाल

स्विस राष्ट्रीय बँकेचा अहवाल

  • सर्व बँकांसोबतचे वार्षिक व्यवहार दर्शवणारा ‘Annual Banking Statistics, २०१९’ हा अहवाल स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय बँकेने जाहीर केला आहे.
  • स्वित्झर्लंड बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात भारताचा ७७वा क्रमांक लागतो. या बँकांमध्ये परकीय नागरिक आणि परकीय आर्थिक संस्था यांच्या ठेवींपैकी एकूण ०.०६% ठेवी भारतीयांच्या आहेत.
  • युनायटेड किंग्डमच्या (UK) ठेवी सर्वात जास्त (२७%) असून त्या खालोखाल अनुक्रमे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांचा क्रमांक लागतो.
  • भारतीय नागरिक आणि विविध उद्योगधंदे यांच्या ठेवी २०१८ च्या तुलनेत ५.८ टक्क्याने कमी झाल्या आहेत. ब्रिक्स देशांदरम्यान स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्यात भारताचा शेवटचा तर रशियाचा प्रथम क्रमांक लागतो.
  • स्वित्झर्लंड राष्ट्रीय बँकेचे मुख्यालय झ्युरीक, स्वित्झर्लंड येथे आहे. थॉमस जॉर्डन हे या बँकेचे चेअरमन. 
  • भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांचे ह्या यादीतील क्रमांक पुढीलप्रमाणे-
    1. पाकिस्तान- ९९
    2. नेपाळ- ११८ 
    3. म्यानमार- १८६
    4. भूतान- १९६ 
    5. श्रीलंका- १४८
    6. बांगलादेश- ८५

THE युनिव्हर्सिटी रँकिंग

  • ‘Times Higher Education (THE)’ या लंडनस्थित संस्थेने जाहीर केलेल्या ५० किंवा त्यापेक्षा कमी वर्षे जुन्या असलेल्या (तरुण) विद्यापीठाच्या यादीत भारतातील आयआयटी रोपार आणि आयआयटी इंदौर या दोन संस्थांनी जगात ६२वा व ६४वा क्रमांक पटकावला आहे.
  • या यादीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, हाँगकाँग (HKUST) या संस्थेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे नानयांग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, सिंगापूर आणि पॅरिस सायन्स एत लेटर्स, फ्रान्स या विद्यापीठांनी पटकावला आहे.
  • ‘Times Higher Education’ संस्था दरवर्षी विविध ९२ देशांमध्ये असलेल्या १४०० विद्यापीठांचे मूल्यांकन खालील निर्देशकांच्या आधारे करते.
    • शिकवणे (३०%)
    • संशोधन (३०%)
    • मान्यताप्राप्त प्रशस्तिपत्रे (३०%)
    • आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन (७.५%)
    • औद्योगिक उत्पन्न (२.५%)

Contact Us

    Enquire Now