साहित्यसाधक मधू मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार

साहित्यसाधक मधू मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार

 • ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ जाहीर करण्यात आला आहे.
 • यंदा पहिल्यांदाच कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्चला या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
 • यापूर्वी दरवर्षी हा सन्मान कुसुमाग्रजांच्या जयंतीला २७ फेब्रुवारीला प्रदान केला जात असे.

 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान 

 

 • स्थापना : २६ मार्च १९९०
 • कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे, प्रोत्साहन देणे या प्रेरणेतून स्थापना
 • दर वर्षाआड ‘जनस्थान पुरस्कार’ आणि ‘गोदावरी गौरव’ या सन्मानांचे वितरण ही संस्था करते.

 

जनस्थान पुरस्कार :

 

 • सुरुवात : विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) (१९९३)
 • ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या धर्तीवर केवळ मराठीतील साहित्यिकांसाठी

अ) एक लाख रोख रुपये

ब) ब्रांझची सूर्यमूर्ती

क) सन्मानपत्र

 

आजतागायत जनस्थान पुरस्कार प्राप्त साहित्यिक

 

१९९१ – विजय तेंडुलकर

१९९३ – विंदा करंदीकर

१९९५ – इंदिरा संत

१९९७ – गंगाधर गाडगीळ

१९९९ – व्यंकटेश माडगूळकर

२००१ – श्री. ना. पेंडसे

२००३ – मंगेश पाडगावकर

२००५ – नारायण सुर्वे

२००७ – बाबूराव बागुल

२००९ – ना. धों. महानोर

२०११ – महेश एलकुंचवार

२०१३ – भालचंद्र नेमाडे

२०१५ – अरुण साधू

२०१७ – डॉ. विजया राजाध्यक्ष

२०१९ – वसंत आबाजी मोडक

२०२१ – मधू मंगेश कर्णिक

गोदावरी गौरव – साहित्येतर क्षेत्रांसाठी (ज्ञान – विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, नृत्य-संगीत, नाट्यचित्र, जनसेवा)

स्वरूप – रुपये २१ हजार प्रत्येकी व मानचिन्ह

 

 • मधू वामन कर्णिक

 

  • जन्म : २८ एप्रिल १९३३१ (कणकवली)
  • टोपणनाव : मधुभाई
  • मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक
  • प्रसिद्ध साहित्यकृती :
  • आत्मचरित्र : करुळचा मुलगा
  • कथासंग्रह : कोकणी गं वस्ती (पहिला), कॅलिफोर्नियात कोकण, केवडा, गावाकडच्या गाजाली, झुंबर, मनस्विनी, लामणदिवा
  • कादंबरी – कातळ, जुईली, तारकर्ली, देवकी, माहीमची खाडी
  • लेखन असलेल्या दूरदर्शन मालिका – जुईली, भाकरी आणि फूल, रानमाणूस, सांगाती

 

 • पुरस्कार/मानसन्मान :

 

  • १९९० – ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • २०१० – ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार
  • २०१६ – दमाणी पुरस्कार
  • २०१८ – विंदा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार लाभसेटवार पुरस्कार
  • २००२ – पद्‌मश्री

 

 • भूषविलेली पदे :

 

  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
  • कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्टचे संस्थापक
  • कोकण मराठी साहित्य, परिषदेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा

Contact Us

  Enquire Now