संघ लोकसेवा आयोगाचे (यू.पी.एस.सी) अध्यक्ष म्हणून प्रदीप कुमार जोशी यांची नेमणूक
-
- ६ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदीप कुमार जोशी यांची यू.पी.एस.सी चे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
- माजी अध्यक्ष अरविंद सक्सेना यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
- प्रदीप कुमार जोशी
-
- २०१५ मध्ये संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- यापूर्वी त्यांनी छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठाचे (NUEPA – स्थापना – १९६२) माजी संचालक
- प्रशासनामधील अनेक समित्यांचे सदस्यत्व
- संघ लोकसेवा आयोग
-
- राज्यघटनेच्या भाग १४ मधील कलम ३१५ ते ३२३ मध्ये या आयोगाची संरचना, सदस्यांची नियुक्ती आणि पदच्युतीबाबत तरतूद
- राष्ट्रपती अध्यक्ष व इतर सदस्यांची नेमणूक करतात.
- सदस्यांची संख्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाही. ही बाब राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर सोडली आहे.
- निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारांच्या सेवेत किमान १० वर्षे असावेत. हे वगळता राज्यघटनेत कोणतेही निकष सांगितलेले नाहीत.
- कार्यकाळ – ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यांपैकी जे अगोदर पूर्ण होईल, तोपर्यंत.
- महत्त्वाचे –
- १५ वी घटनादुरुस्ती, १९६३ अन्वये राष्ट्रपती एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतात.
- १९१९ च्या भारत सरकारच्या कायद्याने १९२६ साली संघलोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
- राज्यलोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हे संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी किंवा सदस्यत्वासाठी किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो.