शौर्य मिसाईल
- डीआरडीओने 3 ऑक्टोबर 2020 रोजी अण्वस्त्रवाहू शौर्य मिसाईलची यशस्वी चाचणी केली.
शौर्य मिसाईलबद्दल:
– हायपरसॉनिक (आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट किंवा त्यापेक्षा जास्त वेगवान) अण्वस्त्रवाहू मिसाईल
-जमिनीवरून जमिनीवर मारा करता येण्याची क्षमता. भूदल आणि नौदल दोघांना उपयुक्त.
– लांबी:10 मीटर
वजन: 6.2 टन
वेग:7.5 मॅक
क्षमता: 1 टन आण्विक साठा
रेंज: मिडीयम रेंज 800-1900 किलोमीटर
- शौर्य मिसाईल सॅटेलाईट इमेजिंग आणि रडार तंत्रज्ञानाला सापडणे कठीण असल्यामुळे विशेष ठरते. आण्विक शस्त्रांसोबतच इतर दारुगोळा ही शौर्य वाहू शकते.
- हायपरसॉनिक मिसाईल बनवण्याच्या तंत्रज्ञानात रशिया, चीन आणि अमेरिका ही राष्ट्रे आघाडीवर आहेत. शौर्य क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत ही या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे असे म्हणता येईल.