व्हिएतनाममध्ये ११०० वर्षे जुने शिवलिंग सापडले
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला व्हिएतनाममधील मायसोनमध्ये असलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांमध्ये ११०० वर्षं जुने शिवलिंग सापडले आहे.
- मायसोन अभयारण्य हे व्हिएतनाममधील क्वांग नाम राज्याचा भाग आहे. येथील मंदिरे चौथ्या ते तेराव्या शतकादरम्यान चंपा घराण्यातील शासकांनी निर्माण केली आहेत.
- मायसोन व्हिएतनाममधील प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. या ठिकाणाला युनेस्को आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणूनही मान्यता मिळालेली आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग :
- मुख्यालय : नवी दिल्ली
- डायरेक्टर जनरल : श्रीमती व्ही. विद्यावती
- मंत्रालय : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय