व्हिएतनाममध्ये ११०० वर्षे जुने शिवलिंग सापडले

व्हिएतनाममध्ये ११०० वर्षे जुने शिवलिंग सापडले

  • भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला व्हिएतनाममधील मायसोनमध्ये असलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांमध्ये ११०० वर्षं जुने शिवलिंग सापडले आहे.
  • मायसोन अभयारण्य हे व्हिएतनाममधील क्वांग नाम राज्याचा भाग आहे. येथील मंदिरे चौथ्या ते तेराव्या शतकादरम्यान चंपा घराण्यातील शासकांनी निर्माण केली आहेत.
  • मायसोन व्हिएतनाममधील प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. या ठिकाणाला युनेस्को आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणूनही मान्यता मिळालेली आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग :

  •   मुख्यालय : नवी दिल्ली
  •   डायरेक्टर जनरल : श्रीमती व्ही. विद्यावती
  •   मंत्रालय : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय

Contact Us

    Enquire Now