विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा २०२१
ठिकाण : विम्बल्डन, लंडन (UK)
कालावधी : २८ जून ते ११ जुलै २०२१
आवृत्ती : १३४वी
पहिल्यांदा आयोजन : १८७७
- दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कोविड-१९ मुळे २०२० ची स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
- जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा.
पुरुष एकेरी :
- विजेता : नोवाक जोकोविच (सर्बिया)
- इटलीच्या मातेओ बेरेटिनीला पराभूत केले.
- जागतिक क्रमवारीत ३४ वर्षीय जोकोविच अव्वल स्थानावर आहे.
- जोकोविचने रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधत त्याच्या संपूर्ण कारकीर्दीतील विसावे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
- १९६८ नंतर विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीचे सहा वेळा विजेतेपद जिंकणारा जोकोविच तिसरा खेळाडू. (२०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१)
- ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांसह हे मोसमातील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद.
- विम्बल्डनमधील जोकोविचचा हा सलग २१ वा विजय.
जोकोविचने पटकाविलेले ग्रँडस्लॅम विजेतेपद :
१) | विम्बल्डन | ६ |
२) | ऑस्ट्रेलियन ओपन | ९ |
३) | फ्रेंच ओपन | २ |
४) | अमेरिकन ओपन | ३ |
महिला एकेरी :
- विजेता : ॲश्ले बार्टी (ऑस्ट्रेलिया)
- झेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा पराभव केला.
- बार्टीचे हे फ्रेंच ओपननंतरचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद असून विम्बल्डनचे पहिले जेतेपद आहे.
- मार्गारेट कोर्ट व इव्होनी कावलीनंतर विम्बल्डन जेतेपद जिंकणारी तिसरी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू.
- २५ वर्षीय बार्टीने २०११ मध्ये विम्बल्डन ज्युनिअरचे जेतेपद पटकाविले होते.
ज्युनियर मुलांचे एकेरी :
- विजेता : समीर बॅनर्जी (अमेरिका)
- भारतीय वंशाच्या समीरने अमेरिकेच्या व्हिक्टर लिलोवर मात केली.