वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद

वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद

  • अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची २४वी बैठक २ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडली.

या बैठकीदरम्यान पुढील बाबींवर चर्चा करण्यात आली.

१) ताणलेल्या मालमत्तेचे व्यवस्थापन

२) आर्थिक स्थिरता विश्लेषणासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे.

३) नादारी व दिवाळखोरी संहितेशी संबंधित मुद्दे

४) सरकारी अधिकाऱ्यांची डेटा शेअरिंग यंत्रणा

५) भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण

६) पेन्शन क्षेत्राशी संबंधित समस्या

  • आर्थिक स्थिरता, आर्थिक क्षेत्राचा विकास, आंतरनियामक समन्वय, वित्तीय साक्षरता, वित्तीय समावेशन आणि मोठ्या आर्थिक समूहांच्या कामकाजासह अर्थव्यवस्थेचे व्यापक पर्यवेक्षण यांसारख्या एफएसडीसीच्या आदेशांवरही याप्रसंगी चर्चा करण्यात आली.
  • वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद (Financial Stability and Development Council)
    • २००८ च्या रघुराम राजन समितीने वित्तीय क्षेत्रांतील सुधारणांसाठी सर्वप्रथम एफएसडीसीच्या स्थापनेची शिफारस केली होती.
    • स्थापना : २०१० (वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत गैर-वैधानिक सर्वोच्च परिषद)

रचना 

१) अर्थमंत्री (अध्यक्ष)

२) सदस्य :

अ) सर्व वित्तीय क्षेत्र नियामकांचे प्रमुख (आरबीआय, सेबी, पीएफआरडीए, आयआरडीए)

ब) वित्त सचिव

क) आर्थिक कामकाज विभागाचे सचिव

ड) वित्तीय सेवा विभागाचे सचिव

इ) मुख्य आर्थिक सल्लागार

  • २०१८ मध्ये एफएसडीसीची पुनर्रचना करण्यात आली व त्यात आर्थिक कामकाज विभागाशी संबंधित राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव, भारतीय नादारी व दिवाळखोरी बोर्डचे अध्यक्ष आणि महसूल सचिव यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • आरबीआयचे गव्हर्नर हे एफएसडीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष  असतात.
  • आवश्यक असल्यास ही परिषद तज्ज्ञांनाही बैठकीस आमंत्रित करते.

Contact Us

    Enquire Now