वायडेन यांच्या मंत्रिमंडळात 12 भारतीय अमेरिकी
- अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे 20 जानेवारीस पदाची शपथ घेणार आहेत.
- बायडेन यांच्या मंत्रिमंडळात 12 भारतीय वंशाचे उच्चपदस्यांचा समावेश असून त्यात सहा महिला आहेत.
- अमेरिकेची सत्ता बायडेन यांच्या रूपाने पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाकडे आली आहे.
मंत्रिमंडळातील भारतीय वंशाचे अमेरिकी नेते –
|
नेता |
माहिती |
1 |
नीरा टंडन |
- व्हाइट हाऊसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालिका
- अनेक मध्यवर्ती संस्थांच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी
|
2 |
वनिता गुप्ता |
- सहाय्यक ॲटर्नी जनरल
- अमेरिकेतील सर्वांत आदरणीय नागरी हक्क वकील, अशा शब्दात बायडेन यांच्याकडून कौतुक
- बराक ओबामा यांनीही अमेरिकन न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
|
3 |
गौतम राघवन |
- अध्यक्षीय कार्यालयात उपसंचालकपदी निवड
- अमेरिकेचे राजकीय सल्लागार म्हणून अनुभव
|
4 |
सब्रिना सिंग |
- माध्यम विभागाच्या उपमंत्री
- बायडेन – कमला हॅरिस यांच्या प्रचारात जनसंपर्काची जबाबदारी
- डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या जनसंपर्क उपसंचालक
|
5 |
आयेशा शाह |
- डिजिटल धोरण विभागात ‘पार्टनरशिप मॅनेजर’
- बायडेन – हॅरिस यांच्या डिजिटल प्रचाराची जबाबदारी
|
6 |
वेदांत पटेल |
- माध्यम विभागाचे सहाय्यक
- सध्या बायडेन – हॅरिस यांच्या अध्यक्षीय पदग्रहण समितीचे वरिष्ठ प्रवक्ते
|
7 |
डॉ. विवेक मूर्ती |
- आरोग्य विभागात सर्जन जनरल
- वैद्यकीय व संशोधन क्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव
- नौदलातील सार्वजनिक आरोग्य सेवा तुकडीचे माजी व्हाईस ॲडमिरल
- अमेरिकेतील कोरोनाच्या साथीचा प्रभाव कमी करण्याचे आव्हान.
|
8 |
सुमोना गुहा |
- राष्ट्रीय आर्थिक परिषदेत दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालक.
- अल्ब्राईट स्टोनब्रीज ग्रुपच्या वरिष्ठ उपाध्यक्ष असल्यामुळे युरोप व दक्षिण आशियातील बाजारपेठेविषयी मार्गदर्शनाचा अनुभव.
- परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी.
|
9 |
भारत राममूर्ती |
- राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक
- आर्थिक सुधारणा आणि ग्राहक संरक्षणाची जबाबदारी
- रूझवेल्ट इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक
|
10 |
तरुण छाब्रा |
- तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे वरिष्ठ संचालक
- पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्र्यांचे भाषणलेखक म्हणून कामाचा अनुभव
- ऑक्सफर्ड, हॉवर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विद्यमान माजी विद्यार्थी
|
11 |
विनय रेड्डी |
- बायडेन यांचे भाषणलेखन संचालक
- बायडेन उपाध्यक असताना त्यांचे मुख्य भाषालेखक
- ओबामा यांच्या कार्यकाळानंतर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे संपर्क विभागाचे प्रमुख
|
12 |
शांती कलातील |
- लोकशाही आणि मानवी हक्क विभागाच्या समन्वयक
- जागतिक बँकेच्या सल्लागार होत्या.
|