वाघांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरा
- महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत २० वाघांचा मृत्यू झाला असून त्यात १२ वाघ हे पूर्ण वाढ झालेले होते, तर ८ बछड्यांचा समावेश आहे.
- मात्र, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात २२ आणि मध्य प्रदेशात २१ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे.
- वाघांचा कमी होणारा अधिवास, चोरट्या शिकारी, अपघात, अधिवासासाठी होणाऱ्या लढाईत होणारे मृत्यू या कारणांमुळे वाघांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील वाघांचे मृत्यू
वर्षे | मृत्यूसंख्या |
२०१८ | १९ |
२०१९ | २२ |
२०२० | १६ |
मे २०२१ | २० |
भारतातील वाघांचे मृत्यू
राज्य | मृत्यूसंख्या |
मध्यप्रदेश | २१ |
महाराष्ट्र | २० |
कर्नाटक | ८ |
उत्तराखंड | ७ |
उत्तरप्रदेश | ७ |
वाघांचे अधिवास क्षेत्र :
अ) शिवालिक प्रदेश आणि गंगेचा प्रदेश
ब) मध्यभारत आणि पूर्व घाट
क) पश्चिम घाट
ड) ईशान्य आणि ब्रह्मपुत्रा प्रदेश
महत्त्वाचे :
- व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
- व्याघ्र संशोधन आणि नियोजनाची जबाबदारी : केंद्रीय वन्यजीव संस्था, डेहराडून
- व्याघ्र प्रकल्प सुरुवात : १९७३
- योजना अंमलबजावणीची जबाबदारी : राज्यनिहाय व्याघ्र प्रकल्प विभाग
- देशातील २.११% प्रदेश व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव.
- बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर्सपर्यंतचा प्रदेश इको-सेन्सिटीव्ह झोन घोषित करून व्याघ्र प्रकल्पांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- २०१८ च्या चौथ्या व्याघ्रगणनेनुसार २९६७ वाघ देशात, तर महाराष्ट्रात ३१२ वाघांचा समावेश आहे.
- व्याघ्र गणना – LIDAR (Light Detection and Ranging) सर्वेक्षण
- भारतातील व्याघ्र प्रकल्पांचे जनक : कैलास सांकला