वाघांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरा

वाघांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरा

  • महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत २० वाघांचा मृत्यू झाला असून त्यात १२ वाघ हे पूर्ण वाढ झालेले होते, तर ८ बछड्यांचा समावेश आहे.
  • मात्र, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात २२ आणि मध्य प्रदेशात २१ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे.
  • वाघांचा कमी होणारा अधिवास, चोरट्या शिकारी, अपघात, अधिवासासाठी होणाऱ्या लढाईत होणारे मृत्यू या कारणांमुळे वाघांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.

महाराष्ट्रातील वाघांचे मृत्यू

वर्षे मृत्यूसंख्या
२०१८ १९
२०१९ २२
२०२० १६
मे २०२१ २०

भारतातील वाघांचे मृत्यू

राज्य  मृत्यूसंख्या
मध्यप्रदेश २१
महाराष्ट्र २०
कर्नाटक
उत्तराखंड
उत्तरप्रदेश

 

वाघांचे अधिवास क्षेत्र :

अ) शिवालिक प्रदेश आणि गंगेचा प्रदेश

ब) मध्यभारत आणि पूर्व घाट

क) पश्चिम घाट

ड) ईशान्य आणि ब्रह्मपुत्रा प्रदेश

महत्त्वाचे :

  • व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
  • व्याघ्र संशोधन आणि नियोजनाची जबाबदारी : केंद्रीय वन्यजीव संस्था, डेहराडून
  • व्याघ्र प्रकल्प सुरुवात : १९७३
  • योजना अंमलबजावणीची जबाबदारी : राज्यनिहाय व्याघ्र प्रकल्प विभाग
  • देशातील २.११% प्रदेश व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव.
  • बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर्सपर्यंतचा प्रदेश इको-सेन्सिटीव्ह झोन घोषित करून व्याघ्र प्रकल्पांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
  • २०१८ च्या चौथ्या व्याघ्रगणनेनुसार २९६७ वाघ देशात, तर महाराष्ट्रात ३१२ वाघांचा समावेश आहे.
  • व्याघ्र गणना – LIDAR (Light Detection and Ranging) सर्वेक्षण
  • भारतातील व्याघ्र प्रकल्पांचे जनक : कैलास सांकला

Contact Us

    Enquire Now