
ला गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तमिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते ला गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
पार्श्वभूमी:
- नजमा हेपतुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.
- सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
- मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजय कुमार यांनी गणेशन यांना पदाची शपथ दिली.
ला गणेशन:
- जन्म: १६ फेब्रुवारी, १९४५
- राजकीय पक्ष: भारतीय जनता पार्टी
- शिक्षण: एस. एस. एल. बी.
- तमिळनाडू युनिटचे सरचिटणीस होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून कार्य केले आहे.
- २०१६-१८ दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून पदभार सांभाळला आहे.
- २७ ऑगस्ट २०१९ रोजी मणिपूरचे सतरावे राज्यपाल म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
मणिपूर
रत्नभूमी (दी लँड ऑफ ज्यूवेल्स) म्हणून उल्लेख.
- स्थापना: २१ जानेवारी १९७२
- साक्षरता: ७९.८५%
- जमाती: नागा, कुकी-झो
- मणिपुरी नृत्य प्रसिद्ध.
- उत्सव: या शांग (डोल यात्रा) लाइ-हरोबा, रथ यात्रा (कांग), निंगोल चकौबा, दसरा (क्वाक यात्रा)
- राज्यपालांसंबंधित महत्त्वाची कलमे:
कलम | तरतूद |
१५३ | राज्यासाठी एक राज्यपाल असेल. |
१५४ | राज्याचे कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे विहित केली जाईल. |
१५५ | राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीच्या सही- शिक्क्यासह केली जाईल. |
१५६ | पदावधी |
१५७ | राज्यपालपदाच्या पात्रता-
अ) तो भारताचा नागरिक असावा. ब) वयाची ३५ वर्षे पूर्ण असावा. |
१५८ | राज्यपालपदाच्या शर्ती |
१५९ | शपथ |
१६० | विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे. |
१६१ | क्षमादानाचा अधिकार |
१६२ | राज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती |
१७६ | राज्यपालाचे विशेष अभिभाषण |
२१३ | राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार |