राही सरनौबत हिला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
- ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची राही सरनौबत हिने शानदार कामगिरी करत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
- याच गटात युवा नेमबाज मनु भाकर हिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- राहीमार्फत भारताने या स्पर्धेत पहिल्याच सुवर्णपदकाची नोंद केली.
- भारताने या अगोदर एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळवली आहेत.
- राहीने अंतिम फेरीत 39 गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
- फ्रान्सच्या आथिल्डे लॅमोल हिने ३१ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.